Home | National | Punjab | violation with 13 year girls in patiyala

बापाने 30 हजारांसाठी 13 वर्षांच्या मुलीला ढकलले नरकात, ढसाढसा रडत सांगितली आपबीती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 02:38 PM IST

पित्याने कुटूंबियांच्या नकळतपणे आपल्या 13 वर्षांच्या मुलीला देहव्यापार करणा-या महिलेला 30 हजारात विकले.

 • violation with 13 year girls in patiyala

  पटियाला(पंजाब) पित्याने कुटूंबियांच्या नकळतपणे आपल्या 13 वर्षांच्या मुलीला देहव्यापार करणा-या महिलेला 30 हजारात विकले. जवळपास 4 महिने त्याने हे रहस्य कुणालाही सांगितले नाही. घरच्यांनी विचारल्यावर तो म्हणाला की, मुलीला मनालीच्या एका ब्यूटी पार्लर ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवले आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने कुटूंबियांनी त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा त्याने रॅकेट चालवणा-या महिलेस फोन करुन मुलीला एक आठवड्यासाठी घरी पाठवण्याची मागणी केली.

  मुलीने तिच्यासोबत 4 महिने घडलेल्या घटना सांगितल्या
  - 20 ऑगस्ट रोजी पटियाला येथे आल्यानंतर मुलीला घरात नजरबंद करण्यात आले. संधी मिळताच मुलगी पळून शेजारच्या एका महिला डॉक्टरकडे पोहोचली आणि मनालीमध्ये 4 महिने तिच्यासोबत झालेल्या आत्याचाराविषयी सांगितले.
  - तिकडे महिला डॉक्टरने बुधवारी मॉडल टाउन पोलिसांचे वर्तन पाहून मुलीला गुरुवारी डायरेक्टर जुवेनाइल कोर्टात सादर केले.
  - कोर्टाने दखल घेतल्यानंतर जिल्हा चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरने मुलीला संरक्षण देऊन कायदेशीर कारवाई करणे सुरु केली आहे. ही पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत राहते. तर इतर कुटूंब गावात राहते. याचा फायदा उचलून त्याने पैशांच्या लालसेने या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलले.
  - पोलिसांनी या प्रकरणी अजून कुणालाही अटक केलेली नाही. त्या देहव्यापार चालवणा-या महिलेचा शोध घेणे सुरु आहे.

  न्यायाधीश अरोडाने मुलीच्या व्यथा ऐकूण पोलिसांना तात्काळ कोर्टात बोलावले
  - महिला डॉक्टर ही जनहित सेवा सिमिती गौ सेवा आणि संरक्षण दलचे प्रमुख अमित भनौट यांनासोबत घेऊन पीडित मुलीसोबत गुरुवारी जुवेनाइल कोर्टाच्या न्यायाधीश मनी अरोडा समोर हजर झाली.
  - न्यायाधीशाने बंद दरवाज्यामागे महिला वकील प्रितपाल कौर समोर मुलीच्या सर्व जबाब ऐकला. तिने एनजीओ आणि महिला डॉक्टरला प्रश्न केले की, तु पहिले पोलिसांकडे का गेली नाहीस?
  - महिला डॉक्टरने सांगितले की, बुधवारी सरकारी सुट्टी असल्यामुळे मिनी सेक्रेटेरिएटमध्ये कुणीही पोलिस ऑफिसर मिळाले नाही. यानंतर ती मॉडल टाउन पोलिस ठाण्यात गेली होती. परंतू तिथे कोणतीही सुनावणी झाली नाही. यामुळे ती डायरेक्ट कोर्टात आली.
  - ही सर्व घटना ऐकल्यानंतर न्यायाधीश मनी अरोडा यांनी संबंधीत पोलिस स्टेशनमधील सर्व एसएचओंना फोन करुन कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. दुपारी 3 वाजता ड्यूटी ऑफिसर एएसआय मेवा सिंह मुलीच्या वडिलांसोबत कोर्टात पोहोचले. न्यायाधीशांनी एएसआयला संपुर्ण प्रकरणी तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  मुलगी म्हणाली- मी सर्व लोकांना माझी व्यथा सांगितली, कुणालाही दया आली नाही
  - शहरात राहत असताना मुलीचा वडील देहव्यापार करणा-या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्या व्यक्तीने मुलीच्या पित्याची ओळख सेक्स रॅकेट चालवणा-या महिलेशी करुन दिली. ही महिला नाबालिक मुलींना मनालीमध्ये देहव्यापाराच्या व्यवसायात अडकवायची.
  - पीडित मुलीनुसार मनालीमध्ये तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिच्यासोबत अनेक वेळा पाशवी अत्याचार करण्यात आला. विरोध केल्यावर तिला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. तसेच तिला उपाशीही ठेवले जात होते. एकदा तर तिला 2 दिवस पाणीही दिले नाही. हे सर्व तिने मनाली येथे येणा-या लोकांनाही सांगितले, परंतू तिचे कुणीही ऐकले नाही. जे लोक येत होते, ते तिच्यावर अत्याचार करुन निघून जात होते.

  कोर्टाचा निर्णय येईपर्यंत चाइल्ड ऑफिसरांच्या प्रोटेक्शनमध्ये राहणार मुलगी
  कोर्टात मुलीचा जबाब नोंदवला जात असताना चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरची टीम कोऑर्डीनेटर बलजीत कौरही तिथे उपस्थित होत्या. सुरक्षेची कारणं देत त्यांनी मुलीला सांभाळण्याची जबाबदारी कोर्टाकडून घेऊन स्वतःवर घेतली. यासोबतच त्यांनी सांगितले की, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत मुलगी माझ्या जवळ राहिल. मुलगी अजुनही घाबरलेली आहे. तिची काउंसलिंग करण्यात येईल आणि तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यात येईल.

  मुलगी गायब होताच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पिता
  - बुधवारी मुलगी घरातून बाहेर पडून शेजारी महिला डॉक्टरच्या घरी पोहोचली. तिच्या वडिलांना ती घरात दिसली नाही, तर पोलिस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यापुर्वीच स्वतः महिला डॉक्टर मुलीगा पोलिसांकडे घेऊन गेलेली होती.
  - आता गुरुवारी मुलगी कोर्टात पोहोचल्याची माहिती मिळताच. पिता पोलिसांसोबत कोर्टात हजर झाला. तो म्हणाला की, आपल्या पुतणीच्या लग्नासाठी त्यावेळी मी या महिलेकडून 30 हजार रुपये उधार घेतले होते. यामुळे तिने मुलीला मनालीमध्ये ब्यूटी पार्लरचा कोर्ट करण्यासाठी पाठवले. त्याला तिथून महिन्याचे 5 हजार मिळत होते.

Trending