आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मणिपूरमध्ये हिंसाचार; संचारबंदी लागू नागरिकत्व विधेयकास विरोध 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळ- नागरिकत्व संशोधन विधेयकाविरुद्ध पूर्वोत्तर राज्यांत असंतोष उफाळून आला आहे. मंगळवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला. यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

 

पश्चिम व पूर्व इंफाळ भागात सुरू झालेल्या हिंसक घटनांमुळे संचारबंदी लागू केली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही वृत्त वृत्तवाहिन्यांनी देऊ नये, अशी सूचना सरकारतर्फे करण्यात आली आहे. राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. इंफाळ पश्चिमचे पोलिस उपायुक्त चित्रा देवी यांनी सोमवारपासून संचारबंदी लागू केल्याचे सांगितले. लोकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


बिलचा विरोध करणारी संघटना मॅनपॅकने मंगळवारी 'पूर्वोत्तर कयामत दिवस' साजरा केला. विद्यार्थ्यांनी ३६ तासांचा बंदही पुकारला आहे. यामुळे दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. शहरात अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...