आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज : ‘कट रचून दंगल’ घडवल्याचे कलम लावले, ‘दिव्य मराठी’च्या रिपोर्टची पोलिसांकडून दखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पूर्वनियोजित कटानुसारच वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांची तोडफोड झाली. ही बाब ‘दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टमध्ये स्पष्ट झाली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी प्रकरणात १२०-ब हे कलम (कट रचून दंगल घडवणे) वाढवले आहे. तसे जबाबही नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

 

ही तोडफोड उत्स्फूर्त असल्याचे पोलिसांचे शुक्रवारपर्यंत म्हणणे होते. मात्र सोबत हत्यार असणे, दारू पाजून लोकांना चिथावणी देणे, पोलिस पोहोचू नयेत यासाठी अडथळे आणणे, सिक्युरिटीच्या खोलीतील माइक ताब्यात घेऊन आंदोलकांना  चिथावणी, कंपनीतील अधिकाऱ्यांच्या दालनाची इत्थंभूत माहिती असणे ही तथ्ये समोर आली आहेत. यामुळे हा हिंसाचार आधी रेकी व नंतर कट रचून घडवल्याचा प्रकार असल्याचे ‘दिव्य मराठी’ने ग्राउंड रिपोर्टमध्ये स्पष्ट केले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, वाळूजमध्‍ये झालेल्‍या हिंसाचाराचे फोटोज...

 

हेही वाचा,

- कट रचून तोडफोड : 61 कोटींचे नुकसान, 49 कंपन्यांमध्ये इन कॅमेरा पंचनामे, दोन दिवसांत 1500 जणांवर गुन्हे, 36 अटकेत

- पुन्हा हल्ला झाला तर शिवसैनिकांना बोलवा, खासदार खैरे यांनी उद्योजकांना दिला सल्ला

 

 

बातम्या आणखी आहेत...