आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यातील हिंसक मराठा आंदोलन : 170 जणांची सुटका, दर रविवारी ठाण्‍यात लावावी लागणार हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठा अारक्षणाच्‍या मागणीसाठी नऊ अाॅगस्ट राेजी हिंसक अांदाेलन केल्याप्रकरणी पाेलीसांनी माेठया प्रमाणात अांदाेलकांना अटक केली हाेती. या अाराेपींची पाेलीस काेठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात अाले. तेव्‍हा विशेष अतिरिक्त न्यायाधीश के.डी.वढणे यांच्‍या न्यायालयाने संबंधित 170 जणांची प्रत्येकी 15 हजार रुपयांच्‍या जातमुचलक्यावर सुटका केली अाहे.

 

पुणे बार असाेसिएशन मार्फत मराठा अांदाेलकांच्या केसेस माेफत लढण्याचा ठराव करण्यात अाला हाेता. त्याप्रमाणे बार असाेसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली बार काैन्सिलच्या वकीलांनी अांदाेलकांच्या केसेस न्यायालयात माेफत चालविल्या. पुण्यातील काेथरुड, वारजे, हिंजवडी, डेक्कन, बंडगार्डन, सिंहगड राेड अशा वेगवेगळया पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या केसेस एकाच न्यायालयात चालविण्यात याव्यात, अशी मागणी बार असाेसिएशनच्या वतीने वकीलांनी न्यायालयात केली हाेती. त्यानुसार मंगळवारी सदर सर्व केसेस एकत्रित करुन त्या विशेष अतिरिक्त न्यायाधीश के.डी.वढणे यांच्या न्यायालयात सुनावणीस अाल्या. न्यायालयाने संबंधित कार्यकर्त्यांची प्रत्येकी 15 हजार रुपयांच्‍या जातमुचलक्यावर सुटका केली असून त्यांना दर रविवारी जवळील पाेलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...