आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन गायिका एसझेडएशी वांशिक भेदभावाचा व्यवहार; सेफाेरा स्टाेअर्समध्ये खरेदी करताना चाेरीचा आळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅस एंजलिस - अमेरिकेतील ख्यातनाम गायिका एसझेडएने मागील महिन्याच्या सुरुवातीला सेफोरा या ब्यूटी चेन दुकानावर गंभीर आरोप केले होते. सेफोरा स्टोअरमध्ये खरेदी करताना आपल्याशी वंशवादी व्यवहार केल्याचे तिचे म्हणणे आहे. सँडी नावाच्या कर्मचाऱ्याने तिच्यावर चोरी करीत असल्याचा आरोप करून तिला खरेदी करण्यापासून रोखले. तपासणी करण्यासाठी सँडीने सुरक्षा कर्मचाऱ्यालाही बोलवले. मी कृष्णवर्णीय असल्यामुळेच हा आरोप लावल्याचे तिचे म्हणणे आहे. सेफोरा स्टोअरने आता हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. कंपनीने बुधवारी आपली सगळी दुकाने बंद ठेवली. या काळात देशातल्या सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुकानात येणाऱ्या सर्व जातीच्या लोकांबरोबर सारखा व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एसझेडएने सेफोरावर आरोप केल्यावर कंपनीने ट्वीट करून त्याला उत्तर दिले.

 

या ट्वीटमध्ये म्हटले होते की, तुम्ही (एसझेडए)सेफोरा कुटुंबाच्या सदस्य आहात. आमच्या दुकानात कोणाबरोबर भेदभाव होणार नाही यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.आमच्याकडे वंशवादाला थारा दिला जाणार नाही याबद्दल विश्वास देतो. एसझेडए आधी सेफॉरमध्ये काम करत होती. परंतु एक व्यक्ती च्या कारणामुळे दुकाने बंद ठेवून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे सेफोराला मान्य नाही. सेफाेरा प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी दीर्घकाळापासून ही याेजना तयार करत अाहे. परंतु तज्ज्ञांच्या मते एसझेडएने आराेप केल्यानंतर सेफाेराला आपली प्रतिमा सुधारण्याची गरज भासली आणि म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. एसझेडए ही अमेरिकेतील सर्वात लाेकप्रिय गायकांपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...