आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखाच्या कारसाठी 6 लाखांत खरेदी केला 0001 व्हीआयपी नंबर, त्यामुळेच असे म्हणतात...शौकिनांची गोष्टच निराळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - व्हीआयपी नंबरसाठी मोठी बोली लागणे ही साधारण बाब आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, 3 लाख रुपयांच्या कारसाठी '001' या व्हीआयपी नंबरसाठी 5 लाख 21 हजार रुपये एवढी बोली लावण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जयपूरने शुक्रवारी बीएस-5 प्रकारातल्या चारचाकी वाहनांसाठी उघडण्यात आलेल्या नवीन सीरीज आरजे 45 च्या RJ45 CM 0001 नंबरच्या निलामीचे आयोजन केले होते. यामध्ये 0001 नंबरसाठी 1.1 लाखाचा डिमांड ड्राफ्ट लावून चार लोकांना अर्ज सादर केला होता. यामध्ये मर्सिडीजपासून मारुती ऑल्टो कारचा समावेश होता. यामध्ये ऑल्टोचे मालक संजयने 5.21 लाख सर्वाधिक बोली लावली. 

 

असा आहे हा खेळ

ऑल्टोची किंमत : 3.02 लाख रु.
नंबरसाठी लावलेली बोली : 5.21 लाख रु.
अर्जसाठीचा डीडी : 1.01 लाख रु.
नंबरची एकूण किंमत : 6.22 लाख रु.

 

पहिल्यांदाज.... महागड्या नाही तर साधारण गाडीला मिळाला व्हीआयपी नंबर 

आरटीओ राजेंद्र कुमार वर्मा यांनी सांगितले की, पहिल्यांदाच मर्सिडीज गाडी नाही तर ऑल्टो कारला हा व्हीआयपी नंबर मिळाला आहे. मर्सिडीजच्या कार मालकाने बोलीची सुरुवात केली होती. वॅगरआर, क्रेटा आणि ऑल्टो कारचे मालक बोली लावत गेले. आकडा 1.5 लाखवर पोहोचताच मर्सिडीज कारचा मालक मध्येच बोली सोडून निघून गेला.