आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका साेप्या हाेतील; पुस्तकावरून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना आता त्रास हाेणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जेईई', 'नीट' अशा सर्वाेच्च परीक्षा घेणारी संस्था म्हणजे 'एनटीए'. तिचे महासंचालक विपिन जाेशी यांची विशेष मुलाखत... 
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या संस्थेला नाेव्हेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण हाेणार अाहे. एनटीएच्या सूचनेनुसार स्पर्धा परीक्षांच्या पॅटर्नमध्ये अनेक बदल झाले असून, अजूनही काही बदल हाेणार अाहेत. याच सर्व मुद्द्यांवर 'दिव्य मराठी'च्या रत्नप्रिया यांनी विपीन जाेशी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतील मुख्य मुद्दे असे... 

प्रश्न : 'जेईई'सारख्या इतर परीक्षांच्या पॅटर्नमध्ये काय बदल हाेतील? 
उत्तर : मी हे करू शकताे असे प्रत्येक मुलाला वाटेल अशी चाचणी असावी, हेच अामचे उद्दिष्ट अाहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याचा अर्थ असा नाही की, कठीण प्रश्नपत्रिका बनवल्या जाव्यात. विद्यार्थिनींना काेचिंगसाठी बाहेर जाण्याची संधी दिली जात नाही. त्या केवळ याच भीतीमुळे या परीक्षा देत नाहीत. त्यामुळे अाम्ही कठीण प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रथा संपुष्टात अाणू इच्छिताे. त्यामुळे संस्थांमध्ये 'जेंडर गॅप' कमी हाेऊन समानता वाढेल. 

प्रश्न : मुलांना प्रश्नपत्रिकांत काय बदल दिसतील? 
उत्तर : पॅटर्नमध्ये बदल हाेऊ शकतात. मात्र, २०१९ च्या सुरुवातीच्या परीक्षांपर्यंत ते हाेणार नाहीत; परंतु भविष्यात प्रश्नांचा पॅटर्न बदलून ताे 'अॅप्लिकेशन बेस्ड' करण्याचा प्रयत्न अाहे. बहुविध प्रश्न निवडीचा पॅटर्नही बदलला जाऊ शकताे. प्रश्न मात्र पर्यायी (अाॅब्जेक्टिव्ह) स्वरूपाचेच राहतील. तसेच एका वाक्यातील उत्तरांचे प्रश्न समाविष्ट हाेऊ शकतात. यात एनसीईअारटीच्या पुस्तकांवरून (टेक्स्ट बुक) अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना त्रास हाेणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 

प्रश्न : 'नीट' दाेनदा घेण्याची घाेषणा झाली हाेती. ती पुन्हा मागे घेण्यात अाली. 
उत्तर : प्रथम 'जेईई मेन'साेबत 'नीट' परीक्षाही दाेनदा घेण्याचे ठरले हाेते; परंतु तसे झाले नाही. 'जेईई मेन' परीक्षा मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या एनटीएकडून घेतली जाते. ती दाेनदा घेण्याचा निर्णय मंत्रालयाचा हाेता. याचप्रमाणे 'नीट' अाराेग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. मात्र, 'नीट' अाताच सुरू झाल्याने त्यासाठी काही वेळ दिला जावा, असा त्यांचा विचार हाेता. तथापि, भविष्यात 'जेईई मेन'च्या यशाच्या अाधारे 'नीट' ही दाेनदा घेतली जाऊ शकते. 
प्रश्न : दाेनदा घेतलेल्या परीक्षेचा सकारात्मक परिणाम हाेईल, असे तुम्हाला वाटते काय? 
उत्तर : मुलांवरील दबाव कमी हाेईल. 'जेईई मेन' वर्षातून दाेनदा घेण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू हाेती. काही कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या किंवा पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून सुमारे ५ वर्षांपूर्वी याची शिफारस केली गेली हाेती. ती अाता लागू झाली अाहे. 

प्रश्न : 'जेईई मेन'मध्ये टाय ब्रेकिंगसाठी वयाची अट का अाहे? 
उत्तर : 'जेईई मेन'मध्ये टाय ब्रेकिंगसाठी गणित, भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर वयाची अट टाकण्यात अाली अाहे. ज्यांचे वय जास्त असेल, त्यांना उच्च श्रेणी मिळेल. अधिक वय झालेल्यांना भविष्यात कमी संधी असल्यानेच हा नियम बनवला गेला अाहे. तथापि, 
 उर्वरित महिला विश्व पानावर 

प्रश्न : 'जेईई'सारख्या इतर परीक्षांच्या पॅटर्नमध्ये काय बदल हाेतील? 
उत्तर : मी हे करू शकताे असे प्रत्येक मुलाला वाटेल अशी चाचणी असावी, हेच अामचे उद्दिष्ट अाहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याचा अर्थ असा नाही की, कठीण प्रश्नपत्रिका बनवल्या जाव्यात. विद्यार्थिनींना काेचिंगसाठी बाहेर जाण्याची संधी दिली जात नाही. त्या केवळ याच भीतीमुळे या परीक्षा देत नाहीत. त्यामुळे अाम्ही कठीण प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रथा संपुष्टात अाणू इच्छिताे. त्यामुळे संस्थांमध्ये 'जेंडर गॅप' कमी हाेऊन समानता वाढेल. 

प्रश्न : मुलांना प्रश्नपत्रिकांत काय बदल दिसतील? 
उत्तर : पॅटर्नमध्ये बदल हाेऊ शकतात. मात्र, २०१९ च्या सुरुवातीच्या परीक्षांपर्यंत ते हाेणार नाहीत; परंतु भविष्यात प्रश्नांचा पॅटर्न बदलून ताे 'अॅप्लिकेशन बेस्ड' करण्याचा प्रयत्न अाहे. बहुविध प्रश्न निवडीचा पॅटर्नही बदलला जाऊ शकताे. प्रश्न मात्र पर्यायी (अाॅब्जेक्टिव्ह) स्वरूपाचेच राहतील. तसेच एका वाक्यातील उत्तरांचे प्रश्न समाविष्ट हाेऊ शकतात. यात एनसीईअारटीच्या पुस्तकांवरून (टेक्स्ट बुक) अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना त्रास हाेणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 

प्रश्न : 'नीट' दाेनदा घेण्याची घाेषणा झाली हाेती. ती पुन्हा मागे घेण्यात अाली. 
उत्तर : प्रथम 'जेईई मेन'साेबत 'नीट' परीक्षाही दाेनदा घेण्याचे ठरले हाेते; परंतु तसे झाले नाही. 'जेईई मेन' परीक्षा मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या एनटीएकडून घेतली जाते. ती दाेनदा घेण्याचा निर्णय मंत्रालयाचा हाेता. याचप्रमाणे 'नीट' अाराेग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. मात्र, 'नीट' अाताच सुरू झाल्याने त्यासाठी काही वेळ दिला जावा, असा त्यांचा विचार हाेता. तथापि, भविष्यात 'जेईई मेन'च्या यशाच्या अाधारे 'नीट' ही दाेनदा घेतली जाऊ शकते. 
प्रश्न : दाेनदा घेतलेल्या परीक्षेचा सकारात्मक परिणाम हाेईल, असे तुम्हाला वाटते काय? 
उत्तर : मुलांवरील दबाव कमी हाेईल. 'जेईई मेन' वर्षातून दाेनदा घेण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू हाेती. काही कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या किंवा पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून सुमारे ५ वर्षांपूर्वी याची शिफारस केली गेली हाेती. ती अाता लागू झाली अाहे. 

प्रश्न : 'जेईई मेन'मध्ये टाय ब्रेकिंगसाठी वयाची अट का अाहे? 
उत्तर : 'जेईई मेन'मध्ये टाय ब्रेकिंगसाठी गणित, भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर वयाची अट टाकण्यात अाली अाहे. ज्यांचे वय जास्त असेल, त्यांना उच्च श्रेणी मिळेल. अधिक वय झालेल्यांना भविष्यात कमी संधी असल्यानेच हा नियम बनवला गेला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...