आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७४ वर्षीय प्रेमजींनी ‘विप्रो’ १.७६ लाख कोटींचा समूह घडवला; २१ व्या वर्षी वनस्पती तेल उद्योगही सांभाळला... आता निवृत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी ५३ वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर आता निवृत्त होऊ इच्छित आहेत. ते ३० जुलैला कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होतील. जुलैमध्ये वयाच्या  ७४ व्या वर्षी प्रेमजी नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व संस्थापक चेअरमनपदी कायम राहतील.

 

एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून त्यांचे मोठे पुत्र रिशाद प्रेमजी विप्रोचा कारभार सांभाळतील. रिशाद सध्या मुख्य रणनीती अधिकारी व संचालक मंडळ सदस्य आहेत. प्रेमजी यांनी ५३ वर्षांत वडिलांच्या वनस्पती तेल बनवणाऱ्या कंपनीपासून भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनीपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात १९६६ मध्ये झाली होती. वडिलांच्या निधनामुळे वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभियांत्रिकीचे शिक्षण अर्ध्यात सोडून व्यवसाय सांभाळला होता. तेव्हा १३.८५ कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या कंपनीत साबण, ट्यूबलाइटसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये कंपनीचे नाव बदलून विप्रो ठेवले. १९७९ मध्ये भारत सरकारने आयबीएमला देश सोडण्यास सांगितले तेव्हा त्यांनी संगणक व्यवसायात पाऊल टाकले. आंतरराष्ट्रीय भागीदारासोबत १९८१ मध्ये प्रथमच १६ बिट मल्टिटास्किंग कॉम्प्युटर बाजारात आणले. यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये नवा टप्पा गाठला. भारतातील बहुतांश कंपन्या देशांतर्गत वापराची उत्पादने तयार करत होत्या त्या काळात प्रेमजींनी विप्रोला आयटी पॉवर हाऊसमध्ये रूपांतरित केले आणि विदेशी बाजारात स्थान निर्माण केले. सध्या विप्रो आयटी, बीपीओ, कंझ्युमर गुड्स, प्रिसिजन इंजिनिअरिंग, हेल्थकेअर सिस्टिमसारख्या व्यवसायांसोबत ५८ देशांत आहे. 

 

४४ वर्षीय रिशाद सध्या मुख्य रणनीती अधिकारी आहेत..

२००७ मध्ये विप्रोत दाखल झालेले रिशाद इन्व्हेस्टर रिलेशन सांभाळतात. विप्रोपूर्वी ते लंडनमध्ये बेन अँड कंपनी व अमेरिकेत जीई कॅपिटलमध्ये कार्यरत होते. 

 

प्रेमजींनी आतापर्यंत १.४ लाख कोटी रुपये दान केले आहे


रिशादने १.७१ लाख कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिले... “आमचे हे लोक हीच विप्रोची शक्ती आहे. यशात विनम्रता, कठीण स्थितीत लवचिकपणा हेच आपले चरित्र असल्याची जाणीव मला १२ वर्षांत झाली.’

 

बातम्या आणखी आहेत...