RBI / आचार्य 8 महिन्यापूर्वी म्हणाले हाेते, सरकारी आर्थिक धाेरण टी-20 सारखे, रिझर्व्ह बँक याला कसाेटी क्रिकेट मानते

विरल गिटारवादकही हाेते, 10 गाण्यांना चाल दिली 

विशेष प्रतिनिधी

Jun 25,2019 09:47:00 AM IST

मुंबई - रिझर्व्ह बंॅकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ संपण्याच्या ६ महिने आधीच राजीनामा दिला. रिझर्व्ह बंॅकेचे संचालक सतीश मराठेंनी घाेषणा करताना सांगितले की, माध्यमांनी आता जास्त अर्थ काढू नये. त्यांनी वैयक्तिक कारणासाठी हे पाऊल उचलले. परंतु तज्ज्ञांच्या नजरेतून याची वास्तविक कारणे सुटली नाहीत. सरकारच्या धाेरणाविराेधात विरल रिझर्व्ह बंॅकेबाबत आक्रमक हाेते. गेल्या वर्षी अर्थमंत्री म्हणाले हाेते की, नीरव माेदी व मेहुल चाेक्सीद्वारे पीएनबीच्या फसवणुकीसाठी आरबीआयची बेफीकीरी जबाबदार हाेती. त्याच्या उत्तरात आचार्य यांनी २६ आॅक्टाेबरला एडी श्राॅफ स्मृती व्याख्यानातल्या ९० मिनिटाच्या भाषणात म्हटले की सरकारचा केंद्रीय बंॅकांच्या कामकाजात हस्तक्षेप आपल्या पायावर दगड मारण्यासारखे आत्मघातकी पाऊल आहे. जेथे सरकार केंद्रीय बंॅकांच्या स्वायत्ततेचा सन्मान करत नाही, तेथून अर्थव्यवस्था रसातळाला जाते. आर्थिक धाेरणांच्याबाबतीत सरकारचा दृष्टीकाेन टी-२० सामन्यासारखा असेही ते म्हणाले. तिच आरबीआय याला कसाेटी क्रिकेट मानते.


ऊर्जित पटेल यांनी डिसेंबर २०१८ मध्ये गव्हर्नरपद साेडले हाेते, त्यांनीच आचार्य यांना आणले
विरल गिटारवादकही हाेते, 10 गाण्यांना चाल दिली

न्यूयाॅर्क विद्यापीठात प्राध्यापक राहिलेले विरल आचार्य एक चांगले गिटारवादकही हाते. त्यांनी यादाें के सिलसिले- अ आॅड फ्रेंड्ससह १० गाण्यांना चाल दिली. कधी कधी ते संगीत जलसादेखील करायचे. यातून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या प्रथम या संस्थेसाठी निधी जमवला.


विरल यांचे विचार माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारखे
विरल यांच्याबाबतीत इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसचे प्राध्यापक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणतात, त्यांचे विचार बिलकूल डाॅ. राजन सारखे आहेत. देशातल्या सार्वजनिक बंॅकांना मजबूत करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा हाेती. जाणकारांच्या मते परदेशात शिकलेल्या अर्थतज्ज्ञांची भूमिका सध्याच्या यंत्रणेत संपत असल्याचे आचार्य यांच्या जाण्याने सिध्द हाेत आहे.


महागाईपेक्षा विकासाला महत्व
आचार्य पतधाेरणाच्या टीममध्ये हाेते. महागाईपेक्षा विकासाला महत्त्व द्यायचे. त्यांच्या जाण्याने पतधाेरणावर परिणाम हाेणार नाही. -अभीक बरुआ, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचडीएफसी


राजीनाम्याने फरक पडणार नाही
आचार्य यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा हाेत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. अचानक राजीनाम्यामुळे काही फरक पडणार नाही. -देवेन चौकसे, केआर चौकसे फर्म

X
COMMENT