आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव्ह स्टोरी : प्रियकरासाठी मुलीने नाकारली वडिलांची अब्जावधींची संपत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. प्रेम अंधळे असते हे आपण नेहमीच ऐकत असतो. प्रेमात धन दौलत, जात पात काहीच पाहिले जात नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गजब कहाणीविषयी सांगणार आहोत. एका मुलीने आपल्या प्रेमाखातर अब्जावधींची संपत्ती नाकारली. या मुलीची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीचे नाव एजेंलिन फ्रान्सिस खू आहे. एंजेलिन मेलशिया येथे राहणारी आहे. एंजेलिन मलेशियाच्या एका नामांकित आणि श्रीमंत व्यावसायिक खू के पेंग यांची मुलगी आहे. खू के पेंग यांची 19 अब्जांची संपत्ती आहे. के पेंग की यांची ब्रिटिश लाइफस्टाइल अँड डिझाइन ब्रांड लॉरा ऐशले आणि लग्जरी हॉटेल कॉर्प्स ग्रुपमध्ये मोठी भागीदारी आहे. 2007 मध्ये खू के पेंग यांची मुलगी एंजेलिन जेदीदाह फ्रांसिसच्या प्रेमात पडली होती. 

 

एंजेलिनने याविषयी आपल्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी हे नाते स्विकारण्यास नकार दिला. आता एंजेलिनसमोर दोन मार्ग होते, एकतर तिला प्रेम निवडायचे होते किंवा मग वडिलांची संपत्ती निवडायची होती. पण एंजेलिनने आपले प्रेम निवडले आणि वडिलांच्या अब्जावधींच्या संपत्तीला ठोकर मारली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एंजेलिनने सांगितले की, माझ्या वडिलांचा निर्णय चुकीचा होता यावर मला विश्वास होता. यामुळे मी माझा मार्ग निवडला. 

 

आता एंजेलिनाने आपल्या प्रेमीसोबत लग्न केले आहे आणि ती लंडनमध्ये राहत आहे. एंजेलिन म्हणते की, तिला तिच्या वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा होता पण वडिलांच्या या निर्णयामुळे तिचे हे स्वप्न अर्धवट राहिले. पण एंजेलिनला आशा आहे की, एक दिवस तिच्या वडिलांना त्यांच्या चुकीची जाणिव होईल आणि ते तिला स्विकारतील. 

 

एंजेलिनने 2012 मध्ये आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. एंजेलिनच्या अशा निर्णयामुळे तिला अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. काही लोक एंजेलिनच्या निर्णयाची स्तुती करत आहेत, तर काही लोक या निर्णयावर टिकाही करत आहेत.