आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral : मॉलमध्ये फॅन्सच्या गर्दीने सेल्फीसाठी मलायकाला घेरले, कशीतरी स्वतःला वाचवत पडली बाहेर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मलायका अरोरा एक अशी सेलिब्रिटी आहे जी नेहमी मुंबईमध्ये जिमच्या बाहेर किंवा कुठेही जाताना नेहमी स्पॉट केली जाते. फोटोग्राफर्स तिचे फोटो क्लिक करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत आणि आता तर फॅन्सदेखील तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी हद्द पार करू लागले आहेत. अशातच असे झाले जेव्हा मलायका मुंबईच्या एका मॉलमध्ये पोहोचली. तेव्हा खूप साऱ्या मेल फॅन्सने सेल्फी घेण्यासाठी तिला घेरले. 

 

काशीतरी स्वतःला वाचवू शकली मलायका... 
मलायकाने काही वेळ तर पोज दिल्या पण जेव्हा तिला गरजेपेक्षा जास्त गर्दीने घेरून सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा तिने मोठ्या मुश्किलीने स्वतःला वाचवले आणि आपल्या कारपर्यंत पोहोचली. फॅन्सने तेथेही तिचा पाठलाग सोडला नाही आणि कारपर्यंत जाईस्तो तिच्यासोबत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान मलायकाचे पितादेखील तिच्यासोबत होते.  

 

सोशल मीडिया यूजर्सने व्यक्त केली नाराजी... 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर यूजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. एका यूजरने कमेंट करून सोशल मीडियावर लिहिले, 'देवा, या लोकांना काय झाले आहे, ते मलायकाला चालू सुद्धा देत नाहीयेत. कदाचित त्यामुळेच सेलेब्स परदेशात सुट्ट्या एन्जॉय करणे पसंत करतात. दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'हे खूप भयंकर आहे, कोणत्याही महिलेसोबत हे होऊ शकते. मला नाही माहित की, पर्सनल लाइफमध्ये मलायका कशी आहे पण कोणत्याही महिलेसोबत अशा प्रकारचे वर्तन केले नाही पाहिजे.