आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : खोबरेल तेल इलायचीपासून डेंग्यूवर उपचार करण्याचा करण्यात येत आहे दावा, जाणून घ्या काय आहे यामागचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मागील अनेक दिवसांपासून डेंग्यूशी संबंधीत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खोबरतेल आणि इलायचीच्या वापरामुळे डेंग्यूपासून संरक्षण होत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूर येथील डॉ.हरीश भाकुनी यांच्याशी संवाद साधला. जाणून घ्या काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य.... 

काय लिहिले आहे व्हायरल मेसेजमध्ये ?
डेंग्यू पसरत आहे. आपल्या गुडघ्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत खोबरेल तेल लावा. सकाळ ते संध्याकाळपर्यंत एक अँटीबायोटीक प्रमाणे काम करते. डेंग्यूचे डास गुडघ्यापासून वर उडू शकत नाहीत. एखाद्याला डेंग्यू झाला असेल तर हिरवी इलायचीचे दोन दाणे तोंडातील दोन्ही बाजूला ठेवा. पण ते चावू नका. इलायचीचे दाणे तोंडात ठेवल्याने नार्मल आणि प्लेटलेट्स तत्काळ वाढतात. हा संदेश सर्वांना पाठवा ही विनंती.  

हे आहे सत्य 
> एडीस डास मादाच्या चावल्याने डेंग्यू होतो. हे डास फक्त गुडघ्यापर्यंत उडतात हे चुकीचे आहे. मादा एडीज शरीराच्या कोणत्याही उघड्या भागावार दंश करू शकते. खोबरेल तेल गुडघ्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत लावल्यास डासांपासून बजाव होते हे साफ चुकीचे आहे. विशेषज्ञाच्या मते, डासांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी अरोमा ऑईल म्हणजेच सुंदधीत तेलाचा उपयोग केला जातो. त्वचेवर लावण्यासाठी खोबरेलतेलाऐवजी कडुनिंब किंवा निलगिरीचे तेल उपयुक्त मानले जाते. कडुनिंब आणि निलगिरीच्या तेलांमध्ये सुगंध असल्यामुळे ते डासांना आपल्यापासून दूर ठेवतात. तसेच इलायचीचे दाणे तोंडात ठेवा किंवा चावून खाल्ल्याने ते शरीरातील रक्त आणि प्लेटलेट्स वाढवत नाहीत. पण इलायचीचे दाणे कुटुन खाल्ल्याने पोटात थंड वाटते आणि उल्टी-मळमळ होणे थांबते. 

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी हे करा
> डेंग्यू हा पावसाळ्यात पसरणारा आजार आहे. यामुळे घाण पाण्यापासून दूर रहा. घराच्या आजुबाजुला साचलेले पाणी असेल तर ते तेथून साफ करा किंवा त्यात रॉकेलचे काही थेंब टाका. यामुळे डासांची उत्पत्ती वाढणार नाही. रात्री झोपताना मॉसक्यूटो रिपेलेंट्स किंवा मच्छरदानीचा उपयोग करा. आपल्या आजुबाजुला नेहमी स्वच्छता ठेवा आणि डास असलेल्या उघड्या जागेवर झोपू नका. पावसाळ्यात पाणी उकळून किंवा फिल्टर करू प्या. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा प्या
पावसाळ्याच्या दिवसांत सहज संक्रमण होण्यामागे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरी आयुर्वेदिक काढा तयार करु शकता. यासाठी एक लिटर पाण्यात बारीक केलेली सुंठ, तुळशीची पाने, गुळवेलची पेस्ट, कडुनिंब आणि पपईच्या पानांना टाकून उकळून घ्यावे. एक चतुर्थांश राहिल्यानंतर ते काढून घ्या. कोमट प्या. यामुळे रोगांसोबत लढण्यासाठी शरीराची शक्ती वाढते. दिवसातून 3-4 वेळेस घ्यावे. 

 

बातम्या आणखी आहेत...