आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या मृतदेहाजवळ असा रडला होता चिमुरडा.. दोन दिवसांनंतर समोर आले फोटोमागचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात एक मुलगा त्याच्या वडिलांच्या डेड बॉडीजवळ रडत असल्याचे दिसत होते. या फोटोबरोबर असा दावा करण्यात आला होता की, 7 वर्षांचा हा चिमुरडा वडिलांच्या मृतदेहाजवळ रडत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच या मुलाच्या मदतीसाठी 16 लाख रुपये गोळा करण्यात आले आहेत. पण आता या व्हायरल फोटोची एक नवी कहाणी समोर येत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिल नावाच्या व्यक्तीच्या डेडबॉडीजवळ चिमुरडा रडत होता. दिल्लीच्या डाबडीमध्ये गटाराची सफाई करताना दोरी तुटल्याने आणि चिखलात अडकून श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पण फोटो व्हायरल झाल्यानंतर मृत अनिल यांचे आईवडील समोर आले आणि त्यांनी या फोटोबाबतचे नेमके सत्य काय आहे ते सांगितले. 


अविवाहित होता अनिल 
अनिलच्या आई वडिलांनी सांगितले की, त्याचे लग्नच झालेले नव्हते. तो लग्न न करताच एका महिलेबरोबर राहत होता. त्याच्या डेडबॉडीबरोबर जो मुलगा रडतोय तो त्याच महिलेचा पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आहे. म्हणजे डेडबॉडीबरोबर असलेला तो मुलगा मृत अनिलचा मुलगा नव्हता. 


महिलेला आहेत तीन मुले 
मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्या महिलेबरोबर अनिल राहत होता तिला तीन मुले आहेत. फोटोमध्ये दिसणारा मुलगा त्या तिघांपैकीच एक आहे. अनिलच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेचे नाव राणी आहे. तो तिला पत्नीच समजत होता. तर तिच्या मुलांना स्वतःची मुले समजत होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर एनजीओ उदय फाऊंडेशन आणि क्राउडफंडिंग पोर्टल केट्टोने एक अकाऊंट तयार केले होते. त्यावर 2594 लोकांनी पैसे दान केले होते. 

बातम्या आणखी आहेत...