आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेव बनलेल्या रणवीर सिंहचा फोटो होतोय व्हायरल, बुधवारी दीपिकासोबत अडकला विवाह बंधनात : First Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण साता जन्माच्या गाठीत अडकले आहेत. इटलीच्या लेक कोमोमध्ये कोंकणी पध्दतीने 14 नोव्हेंबरला त्यांचे लग्न झाले. आता नवरदेव बनलेल्या रणवीर सिंहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो त्याच्या लग्नातील असल्याचे बोलले जातेय. पण फोटोवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


फोटो खरा आहे की नाही यावर संशय 
- हा फोटो खरा आहे की नाही यावर संशय आहे. कारण याच्या बॅकग्राउंडमध्ये काही फॅमिली फोटोज दिसत आहे. पण लग्न हे इटलीच्या लेक कोमो रिसॉर्टमध्ये झालेय यामुळे तिथे काही फॅमिली फोटो असण्याची शक्यता नाही. 
- दूसरी गोष्ट म्हणजे लग्न कोंकणी पध्दतीने झाले आहे. त्यानुसार रणवीरने साउथ इंडियन व्हाइट ड्रेसिंग केली होती. हे या फोटोमध्ये दिसत नाही. या फोटोमध्ये तो शेरवानीमध्ये दिसतोय. 
- रणवीर आणि दीपिकाचे लग्न दोन पध्दतीने होणार आहे. एक कोंकणी पध्दतीने आणि सिंधी पध्दतीने. कारण दीपिका मुळची दक्षिण भारतीय आहे आणि रणवीर सिंधी आहे. यामुळे 15 नोव्हेंबरला सिंधी पध्दतीने लग्न होईल. 

 

प्रायव्हेट सेरेमनी आहे 
- रणवीर आणि दीपिकाचे लग्न प्रायव्हेट सेरेमनीमध्ये झाले. वेन्यूवर जवळपास 30 पाहूणे होते. यामध्ये रणवीर-दीपिकाचे फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह आणि निवडक मित्र पोहोचले होते. रपोर्ट्सनुसार दीपवीरच्या लग्नात बॉलिवूडमधून शाहरुख खान, फराह खान आणि संजयलीला भन्साळी आणि आदित्य चोप्रा पोहोचले.
 

 

बातम्या आणखी आहेत...