आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गात येताच कपडे काढते ही Teacher; काहीशा अशा अंदाजात शिकवते अवघड विषय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेदरलँड - शाळेत असताना प्रत्येकालाच आपल्या विषयांपैकी एखादा विषय काहीसा अवघड वाटतो. त्याचा अभ्यास म्हटले की कंटाळा येतो. किती समजावून सांगितल्यावर तो विषय लक्षातच येत नाही. जणू त्या विषयाचा प्रत्येक शब्द डोक्यावरूनच जातो. त्यामध्ये बहुधा गणित, फिजिक्स आणि बायोलॉजीचा अशा विषयांचा समावेश आहे. तो समजावून सांगण्याची कला असेल तर कितीही अवघड विषय सोप्या शब्दात मांडता येतो हे नेदरलँडच्या एका टीचरने सिद्ध केले आहे. आपल्या विशिष्ठ शैलीतून या शिक्षिकेने बोअरिंग आणि रटाळ क्लासमध्ये चिमुकल्यांना बोलके केले.


ऑनलाईन मागवली विशेष पोशाख...
- नेदरलंडच्या एका शाळेत बायोलॉजी विषय शिकवणाऱ्या या आहेत डेबी हीरकेन्स... दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम या शिक्षिकेचे फोटो समोर आले होते. तिची शिकवण्याची पद्धत इतकी निराळी आहे की सर्वत्र तिच्या चर्चा उडाल्या. सोशल मीडियावर ती व्हायरल सेलिब्रिटी बनली. प्रत्यक्षात ती मुलांना पुस्तकी ज्ञान देत नाही. वर्गात येऊन ती आपला टॉप आणि लोअर काढते. आतून तिने विशिष्ठ प्रकारचा पोशाख घातलेला असतो. या पोशाखावर मानवी शरीरात असलेल्या स्नायू, हाड आणि संपूर्ण नकाशा मुलांना हुबेहूब दिसून येतो.
- स्वतःच्या अंगावर कलाकारी करून ही शिक्षिका चिमुकल्यांना बायोलॉजीचे धडे देते. तिच्या या शिकवण्याचे रिझल्ट सुद्धा मिळाले आहेत. तिच्या कित्येक मुलांना सुरुवातीला बायोलॉजीचा क्लास कंटाळवाणा वाटायचा. पण आता तिच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी बोलका झाला आहे. विषय सुरू असताना ते उत्सफूर्तपणे सहभागी होतात. केवळ वर्गातच नव्हे, तर होमवर्क सुद्धा पूर्ण करून येतात. त्यांच्या निकालात सुद्धा सुधारणा झाली आहे. तिने हा विशिष्ट असा सूट ऑनलाइन मागवला. त्यासाठी हेड शिक्षिकेने तिला अधिकृत परवानगी देखील दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...