आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख नसताना तु मला पाहिलस, राँग नंबर एकदा लागतो-नेहमी नाही, असे बोलत युवकाला केली बेदम मारहाण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपगढ(राजस्थान)- श्रीगंगानगरच्या अनुपगढमध्ये एका युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, आणि त्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, एक युवती आणि काही युवक त्या बांधलेल्या युवकाला काठीने मारत आहेत. सुत्रांकडून माहिती मिळाली की, ज्या युवकाला मारहाम केली जात आहे, तो युवक त्या युवतीला फोन करून त्रास देत होता. तर पिडीत युवकाने पोलिसकांकडे तक्रार दाखल केली आहे.


26 जानेवारीची घटना, काय आहे व्हिडीओमध्ये

- ही घटना 26 जानेवारीची असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ बुधवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल केली जात आहे. 
- एका युवकाला झाडाला, कपडा आणि साखळीने बांधून एक युवती आणि काही युवक काठीने मारत आहेत. त्या युवतीनेच त्या युवकाला फोन करून भेटायला बोलवले होते.


मुलगी म्हणाली, राँग नंबर एकदा लागतो, नेहमी नाही

- युवती त्याला म्हणाली, तु माझा चेहरा पाहिलास का? ओळख नाही, कधी भेटलो नाही. राँग नंबर एकदा लागतो, नेहमी नाही. 
- व्हीडीओत युवती म्हणते, 'तु जेव्हा फोन करतोस तेव्हा माझे भाउ इथेच असतात. तु माझ नंबर कोणाकडून घेतलास ? चार दिवसांपासून तु मला फोन करत आहेस.' तेथे उपस्थित लोक युवतीला आणि तिच्या भावाना त्या युवकाला न मारण्याचे सांगतात. लोक म्हणाले, 'याच्या पालकांना बोलवून त्यांच्या हवाली करा.'


पिडीत युवकाने केली तक्रार
- पिडीत युवक सुरेंद्र कुमारने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने सांगितले की, 15 जानेवारीला त्याला फोनवर एक मिस्ड कॉल आला होता. त्या नंबरवर कॉल केल्यावर एका मुलीने कॉल रिसीव केला. 
- त्यानंतर आमचे बोलने सुरू झाले. 26 जानेवारीला मला त्या मुलीचा कॉल आला. मुलगी म्हणाली, माझ्या घरी कोणीच नाहीये, आणि मला पैशांची गरज आहे, तु 4-5 हजार रूपये घेऊन ये. 
- मी त्या ठिकाणी गेलो, पण मुलीसोबत चार-पाच युवक आले होते. त्यांनी मला झाडाला बांधले आणि खिशातून माझे पैसे काढून घेतले, आणि मारणे सुरू केले.
 

बातम्या आणखी आहेत...