आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायव्हरचे माकडाचाळे.. प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत ड्रायव्हरने केले असे काम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने गमावली नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - कर्नाटकात एक धक्कादायक प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. यात एका बस ड्रायव्हरने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची जीव धोक्यात टाकणारे कृत्य केले. कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या या ड्रायव्हरच्या त्या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो गाडीच्या स्टोअरिंगवर माकडाला बसवून बस चालवत असल्याचे दिसतेय.


विशेष म्हणजे ड्रायव्हर फक्त माकडाला स्टेअरिंगवर बसवून थांबला नाही तर त्याने थेट माकडाच्या हातातच स्टेअरिंग देऊन टाकले. ड्रायव्हर कशाप्रकारे बेजबाबदारपणे लोकांचा जीव धोक्यात टाकून या माकडाबरोबर माकडचाळे करत आहे हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. अखेर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या ड्रायव्हरला निलंबित करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...