Home | National | Other State | Viral video of Krishna, who was seen riding horse to her exams

घोड्यावर बसून शाळेत जाणारी कृष्णा झाली सोशल मीडिया स्टार, नवीन व्हिडिओत सांगितले- मित्राच्या एका टीकेमुळे शिकली घोडेस्वारी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 11:52 AM IST

कृष्णाचा हा व्हिडिओ व्हायरल, आनंद महिंद्रांनी केले कौतुक

  • व्हिडिओ डेस्क- घोड्यावर बसून शाळेत जाणारी 15 वर्षीय कृष्णा आता सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तो महिंद्रा ग्रुपचे चेयरमॅन आनंद महिंद्रानी ट्वीट केला होता. आता तिचा नवीन व्हिडोओ समोर आला आहे, त्यात तिने घोडेस्वारी शिकण्याचे कारण सांगितले? कृष्णाने सांगितले की, तिच्या एका मित्राने तिला 'घोडेस्वारी साध्या मुली नाही करू शकत, याला फक्त 'झांशीच्या राणी' सारख्या शुरवीर महिलाच करू शकतात.' असे म्हणाला होता. कृष्णाच्या मनाला ते म्हणने लागले आणि तिने घोडेस्वारी शिकली. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या कृष्णाच्या या कारनाम्याने तिचे आई-वडील खूप खूष आहेत.


    कृष्णा रोज 3.5 किमी घोडेस्वारी करून शाळेत जाते. मागील काही दिवसात तिचा व्हिडिओ समोर आल्यावर आनंद महिंद्रांनी तिचे कौतुक करत ट्वीट केले होते- 'वह मेरी हीरो है... उसने मुझे आशावाद से भर दिया।'

Trending