Home | National | Madhya Pradesh | Viral video of madhya pradesh women on social media

परपुरूषावर प्रेम केल्यामुळे पंचायतने सुनावली अमानुष शिक्षा, पतीला पत्नीच्या खांद्यावर बसवून गावभर फिरवले; महिलेला मारहाण करत नाचत होते लोक

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 14, 2019, 03:59 PM IST

आधुनिक भारतात समोर आली विचलित करणारी घटना

 • Viral video of madhya pradesh women on social media

  झाबुआ (मध्य प्रदेश) - विवाहित महिलेने परपुरूषावर प्रेम केल्यामुळे भील पंचायतने संबंधीत महिलेला अमानुष शिक्षा सुनावली. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी नवऱ्याला पत्नीच्या खांद्यावर बसवून गावभर फिरण्यास भाग पाडले. आजुबाजूला बरेच लोक महिलेला मारहाण करत नाचत होते. व्हिडिओ व्हायरला झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटली आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याचा शोध घेण्यात येत आहे. नेमकी घटना कशी घडली याची कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये. हे प्रकरण महिलेशी संबंधित असल्यामुळे तिची ओळख सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


  भील पंचायतची परंपरा

  आदिवासी समाजात भील पंचायतला महत्न आहे. पंचायततीत समस्येचे निराकरण न झाल्यास तेव्हाच वाद पोलिसांत जातो. हे प्रकरण देखील अशाच प्रकारचे आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचा महिलेवर आरोप आहे. गावात परतल्यानंतर तिच्यासोबत असे घडले. याआधी कायद्याप्रमाणे शेकडो लोकांची पंचायत बसली होती. आरोप ऐकवल्यानंतर शिक्षेचे फर्मान सोडण्यात आले. त्यावर अंमलबजावणी करण्यात येऊन महिलेला शिक्षा देण्यात आली.


  आरोपींची चौकशी करून गुन्हा दाखल करणार पोलिस

  झाबुआचे एसपी विनीत जैन यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले. व्हिडिओमधील पती-पत्नीची चौकशी करण्यात आली आहे. महिलेने जर तक्रार दिली नाही तर पोलिस स्वतः तक्रार दाखल करणार आहे. तसेच व्हिडिओतील लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Trending