आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Virat And Anushka Celebrated Win Against Australia In Their Own Style

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरुष्काने मैदानावर असे केले ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन, पाहा दोघांमधील काही Moments

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - येथील मैदानावर भारत - ऑस्ट्रेलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना ड्रॉ होताच भारताने कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण भारतीय संघ जल्लोषात बुडाला होता. यावेळी  भारतीय टीमबरोबर जल्लोष करण्यात आणखी एक सेलिब्रिटीही होती ती म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का आणि विराटने मैदानावर या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी एकमेकांना हग करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. 


भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 71 वर्षांनंतर प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला आहे. या विजयानंतर सगळीकडेच एकच जल्लोषाचे वातावरण होते. या सेलिब्रेशनमध्ये अनुष्का शर्माही सहभागी झाली. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर टीममधील सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडुंच्या कुटुंबीयांसह अनुष्का शर्माही मैदानावर सर्वांचे अभिनंदन करायला पोहोचली. यावेळी अनुष्काने विराटला मिठी मारत आनंद व्यक्त केला.