Cricket / काेहली पदार्पणापासून वनडे, टी-२० मध्ये नंबर वन; इतर फलंदाज आहेत त्याच्या मागे

वनडेत ११,४०६ धावा, इतर फलंदाज ९ हजार धावांच्या अातच अाहेत
 

वृत्तसंस्था

Aug 13,2019 09:42:00 AM IST

नवी दिल्ली - विराट काेहलीने आपल्या शानदार शतकाच्या बळावर टीम इंडियाला रविवारी मध्यरात्री विंंडीजविरुद्ध विजय मिळवून दिला. भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीज संघाचा पराभव केला. भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ५९ धावांनी सामना जिंकला. यासह भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. तसेच आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामन उद्या बुधवारी रंगणार आहे.


या सामन्यातील विजयासाठी काेहलीच्या शतकी खेळीचे माेलाचे याेगदान राहिले. या शतकासह त्याने विंडीज संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या आता या संघाविरद्ध २ हजारांपेक्षा अधिक धावा झाल्या आहेत.

विराट काेहलीचे विंडीजच्या मैदानावर ितसरे शतक साजरे, विदेशी मैदानावरही नंबर वन

विराट काेहली हा गत ११ वर्षात घरच्यासह विदेशातील मैदानावरही अव्वल ठरला आहे. त्याने विदेशी दाैऱ्यातही सर्वाधिक धावा काढल्या. यात काेहली व पाकचा हाफिज प्रत्येकी ९६ डाव खेळले आहेत. मात्र, यात हाफिजच्या नावे १३१९ धावा कमी आहेत. काेहलीचे विंडीजमध्येे तिसरे शतक नाेंद झाले.

क्वीन्स पार्कवर भारताचा सलग पाचवा विजय; विंडीज संघ अपयशी
भारताने डीएलनुसार दुसरा वनडे सामना जिंकला. भारताचा या मैदानावरील हा सलग पाचवा विजय ठरला. भारताने यजमान विंडीजला ५९ धावांनी पराभूत केले. काेहलीच्या शतकाच्या बळावर भारताने विंडीजसमाेर विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजला ४६ षटकांत २७० धावांचे टार्गेट देण्यात आले. मात्र, विंडीजने ४२ षटकांत २१० धावांवर आपला गाशा गुंडाळला.

आता चाैथ्या स्थानी श्रेयस अय्यरला संधी मिळावी : गावसकर
आता भारतीय संघामध्ये चाैथ्या स्थानावरील फलंदाजीसाठी युवा खेळाडू श्रेयस अय्यरला संधी मिळायला हवी,अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिली. सध्या भारतीय संघात चाैथ्या स्थानावर मजबूत आणि आश्वासक अशी फलंदाजी करणारा काेणीही नाही.

माेठी खेळी हीच आहे काेहलीची सर्वपरिचित आेळख : भुवनेश्वर
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीची आेळख ही मैदानावर माेठ्या खेळीसाठीच आहे. त्यामुळे त्याच्याकडून सातत्याने माेठ्या खेळीची अपेक्षा ठेवणे साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या गाेलंदाज भुवनेश्वर कुमारने दिली. त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार गाेलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. त्यामुळे भारताला या सामन्यात झटपट विजयाची नाेंद करता आली.

वनडे: विराट काेहलीच्या नावे आहेत ४२ शतके

कोहलीची वनडेत ६० ची सरासरी आहे. या सरासरीमध्ये ताे आफ्रिकन फलंदाज डिव्हिलियर्सच्या मागे आहे. मात्र, आफ्रिकन फलंदाजांची काेहलीपेक्षा २० शतके कमी आहेत.

टी20: कोहलीचे शतक नाही, मात्र, सर्वाधिक धावा

टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीला अद्याप टी-२० फाॅरमॅटमध्ये शतक साजरे करता आले नाही. मात्र, यात ताे सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

X
COMMENT