Cricket / विंडीजविरुद्ध २ हजार धावा पूर्ण करणारा काेहली एकमेव फलंदाज; पाकिस्तानच्या जावेद मियांदादला टाकले मागे

श्रीलंका, विंडीज  व आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतके  ठाेकणारा काेहली हा पहिला फलंदाज ठरला

वृत्तसंस्था

Aug 12,2019 09:11:00 AM IST

पाेर्ट ऑफ स्पेन - कर्णधार विराट काेहलीने रविवारी यजमान विंडीज संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत शानदार १२० धावांची खेळी केली.यासह त्याने विश्वविक्रमाचा पल्ला गाठला. आता ताे विंडीज संघाविरुद्ध २००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. तसेच त्याच्या नावे एका संघाविरुद्ध वेगवान २ हजार धावा नाेंद झाली. भारताने याच खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना विंडीजसमाेर २८० धावांचे लक्ष्य ठेवले.


नाणेफेक जिंकून कर्णधार विराट काेहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन (२) सपशेल अपयशी ठरला. त्याचा या सामन्यात माेठ्या खेळीचा प्रयत्न यजमान विंडीजच्या गाेलंदाज शेल्डाेन काॅट्रेलने हाणून पाडला. त्यामुळे पायचीत हाेऊन धवन हा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार विराट काेहलीने कंबर कसली. त्याने सलामीवीर राेहित शर्माला माेलाची साथ दिली. या दाेघांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. संघाचा स्काेअर १ बाद ७६ असा असताना राेहित (१८)बाद झाला. त्यानंतर यष्टिरक्षक ऋषभने २० धावांचे याेगदान दिले.

जावेद मियांदादला टाकले मागे

विंडीज संघाविरुद्ध २००० धावा पूर्ण करणारा काेहली हा आता जगातील पहिला फलंदाज ठरला. यादरम्यान त्याने पाकिस्तानच्या माजी दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद यांना मागे टाकले. त्यांच्या नावे विंडीज संघाविरुद्ध १९३० धावांची नाेंद हाेती. मात्र, आता काेहलीने हा त्यांचा विक्रम ब्रेक केला. काेहलीने आता विंडीजविरुद्ध २ हजार ३२ धावांची नाेंद आपल्या नावे केली. याशिवाय विराट काेहली हा एकाच देशाच्या संघाविरुद्ध सर्वात वेगवान २००० धावांचा पल्ला गाठणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यात विक्रमातही त्याने आपल्या देशाच्या राेहित शर्माला मागे टाकले आहे. आता काेहलीची या दुसऱ्या वनडेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली.

तीन संघाविरुद्ध ८ विक्रमी शतके

टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने यजमान विंडीज संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत शानदार १२० धावांची खेळी केली. यासह त्याला विश्वविक्रमाला गवसणी घालता आली. त्याने यादरम्यान ८८ धावा पूर्ण केल्यानंतर लगेच माजी क्रिकेटपटू सचिनसह जयसूर्याला मागे टाकले. या ८८ धावांसह काेहली हा विंडीजविरुद्ध सर्वाधिक २००० धावा काढणारा जगा पहिला फलंदाज ठरला. भारताविरुद्ध २८९९ धावा काढणाऱ्या जयसूर्यालाही विंडीजविरुद्ध २ हजार धावांचा पल्ला कधीही गाठता आला नाही. तसेच चार देशांच्या संघाविरुद्ध २००० व ३००० हजार धावा काढणाऱ्या सचिनलाही या संघाविरुद्ध असा पराक्रम गाजवता आला नाही. श्रीलंका, विंडीज व आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतके ठाेकणारा काेहली हा पहिला फलंदाज ठरला,.

X
COMMENT