आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1200 कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह विराट कोहली पुन्हा अव्वल; दीपिका पदुकोण दुसऱ्या, शाहरुख खान पाचव्या क्रमांकावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सलग दुसऱ्या वर्षी भारताचा अव्वल क्रमांकाचा सेलिब्रिटी ब्रँड ठरला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू १,२०३ कोटी रुपये आहे. दीपिका पदुकोण ७२१ कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. गेल्या वर्षी दीपिका तिसऱ्या क्रमांकावर होती. गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेला शाहरुख खान या वेळी पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू ४२७ कोटी रुपये आहे. अक्षय कुमार (४७३ कोटी रुपये) तिसऱ्या, तर रणवीर सिंह (४४३ कोटी रुपये) चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवरील व्हॅल्युएशन अँड कॉर्पोरेट फायनान्स अॅडव्हायझर्स डफ अँड फेल्प्स'ने ही क्रमवारी तयार केली आहे. सेलिब्रिटी असलेल्या जाहिरातींची संख्या सलग वाढत आहे. २०१७ पर्यंत १,६६० ब्रँडची जाहिरात कोणता ना कोणता सेलिब्रिटी करत होता. २००७ मध्ये हा आकडा ६५० होता. म्हणजेच एका दशकात यामध्ये १५५ टक्के वाढ झाली आहे. अव्वल-२० सेलिब्रिटींकडे २०१८ पर्यंत ३१४ ब्रँडच्या जाहिराती होत्या. २०१७ मध्ये हा आकडा २७२ होता. अव्वल-५ सेलिब्रिटींकडे एकूण १०५ जाहिराती आहेत. यामध्ये २५ ब्रँडच्या जाहिरातींसह रणवीर सिंह सर्वात पुढे आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे २४ ब्रँडच्या जाहिराती आहेत. अहवालानुसार भारतात सेलिब्रिटी एंडोर्समेंट तेजीने व्हॅनिला मॉडेलमधून निघून पार्टनरशिप मॉडेलमध्ये जात आहे. म्हणजेच आता सेलिब्रिटी ब्रँडची केवळ जाहिरातच करत नाही तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यासोबत पार्टनरशिपदेखील करतात. 

 

देशातील अव्वल-५ सेलिब्रिटींकडे असलेल्या एंडोर्समेंटची संख्या 
सेलिब्रिटी - एंडोर्समेंट 

विराट कोहली - २४ 
दीपिका पदुकोण - २१ 
अक्षय कुमार - २२ 
रणवीर सिंह - २५ 
शाहरुख खान - १३ 

 

अव्वल- १० सेलिब्रिटी 
सेलिब्रिट - ब्रँड व्हॅल्यू 

१ विराट कोहली १२०३ 
२ दीपिका पदुकोण ७२१ 
३ अक्षय कुमार ४७३ 
४ रणवीर सिंह ४४३ 
५ शाहरुख खान ४२७ 
६ सलमान खान ३९२ 
७ अमिताभ बच्चन २९० 
८ आलिया भट्ट २५६ 
९ वरुण धवन २२२ 
१० हृतिक रोशन २१८ 

 

नोट : ब्रँड व्हॅल्यू कोटी रुपयात 
 

बातम्या आणखी आहेत...