आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसी क्रमवारीमध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह नंबर वन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात नंबर वन फलंदाज व गोलंदाज म्हणून उतरतील. आयसीसीने बुधवारी सर्व संघांची वनडे क्रमवारी जाहीर केली. इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका आणि वेस्ट इंडीज, बांगलादेश, आयर्लंड यांच्यातील तिरंगी मालिका संपल्यानंतर ही सुधारित क्रमवारी जाहीर झाली.


ही विश्वचषकापूर्वी जाहीर होणारी अखेरची क्रमवारी आहे. आता विश्वचषकापूर्वी कोणतीही मालिका होणार नाही. विराट ८९० गुणांसह वनडेत नंबर वन फलंदाज आहे. बुमराह ७७४ गुणांसह अव्वल गोलंदाज ठरला. भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा ८३९ गुणांसह फलंदाजीत दुसऱ्या, शिखर धवन १३ व्या, महेंद्रसिंग धोनी २३ व्या आणि केदार जाधव २६ व्या स्थानी आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या फलंदाजीत ८५ व्या स्थानी आहे. गोलंदाजीत टीमचे दोन फिरकीपटू कुलदीप यादव सातव्या आणि यजुवेंद्र चहल आठव्या स्थानी राहिले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार १६ व्या, अष्टपैलू रवींद्र जडेजा ३१ व्या, मो. शमी ३३ व्या आणि पांड्या ६१ व्या स्थानी आहे. गोलंदाजीत केदार जाधवची क्रमवारी ९१ वी ठरली.

बातम्या आणखी आहेत...