आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेलबर्न - क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) ने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह यांचा त्यांच्या टेस्ट टीम ऑफ द इयरमध्ये समावेश केला आहगे. नाथन लियोन या टीममध्ये सहभागी असलेला एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे. लियोन आणि भारतीय खेळाडुंशिवाय या टीममध्ये न्यूझीलँड आणि दक्षिण अफ्रीकेच्या दोन-दोन, तर श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडुचा समावेश आहे.
कर्णधार विलियम्सनच्या हाती कमान
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला टीमचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. इंग्लंडचा जोस बटलर विकेटकिपर असेल. श्रीलंकेच्या कुशल मेंडीस आणि न्यूझीलंडच्या टॉम लाथम यांनी सलामी फलंदाज म्हणून निवडले आहे.
यापाठोपाठ नंबर-3 वर विलियम्सन, नंबर-4 वर विराट कोहली आणि नंबर-5 वर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सला निवडण्यात आले आहे. बटलरला सहाव्या क्रमांकावर सहभागी करून घेण्यात आले आहे.
त्यानंतर वेस्टइंडिजचा ऑलराऊंडर जेसन होल्डर, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, लियोन, पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास आणि बुमराह यांचा क्रमांक आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम ऑफ द ईयर
केन विलियम्सन (कप्तान), विराट कोहली, कुशल मेंडिस, टॉम लाथम, एबी डिव्हीलियर्स, जोस बटलर (विकेटकीपर), जेसन होल्डर, कगिसो रबाडा, नाथन लियोन, मोहम्मद अब्बास आणि जसप्रित बुमराह.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.