आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; बनला जगातील पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - यशस्वितेच्या रथावर असलेला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या एलेन बार्डर मागे टाकत जगातील पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटने कोलकाता येथील ईडन गार्डनवर रविवारी बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 46 धावांनी पराभूत करत हा यशाचा पल्ला गाठला आहे. विराट आपल्या नेतृत्वात 53 सामन्यांमधील हा 33 वा विजय आहे आणि यासोबत तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार एलेन बार्डरच्या पुढे निघून गेला. बार्डरने 1984-94 दरम्यान 93 कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाटे नेतृत्व केले होते आणि 32 कसोटी सामन्यांत विजय मिळवला होता.  आपल्या नेतृत्वात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत वेस्टइंडीजचा क्लाइव्ह लॉयड (36 सामन्यांत विजय), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ (41 सामन्यांत विजय) आणि रिकी पॉटिंग (48 सामन्यांत विजय) तथा दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (53 सामन्यांत विजय) हे विराट कोहलीच्या पुढे आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 11व्या वेळी विजय मिळवला आहे. महेंद्र सिंह धोनी आपल्या नेतृत्वात नऊ कसोटी सामने जिंकले होते. मोहम्मद अझरुद्दीने आठ तर सौरभ गांगुलीने सात कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवला होता. विराट कोहलीने यासह डावाच्या फरकाने सलग चार कसोटी सामने  जिंकण्याचा अझरुद्दीचा विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. अझहरच्या नेतृत्वात भारतीय संघाने 1992-93 आणि 1993-94 मध्ये सलग तीन कसोटी सामने डाव्याच्या फरकाने जिंकले होते. विराट कर्णधारपदी असताना हा सलग सातवा विजय आहे. त्याने सलग सहा कसोटी सामने जिंकणाऱ्या धोनीचा विक्रम मोडला. विराटने वेस्ट इंडिजमध्ये 2, दक्षिण आफ्रिकेसोबत 3 आणि बांगलादेशसोबतचे 2 कसोटी सामने जिंकले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले होते. रन मशीन आणि कर्णधार विराट कोहलीन बांगलादेशसोबच्या सामन्यात शतक झळकावले. या शतकासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 5 हजार पूर्ण केल्या आहेत. कर्णधाराच्या रुपात सर्वात जलद 5 हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. या शतकासह तो भारताच्या विशिष्ट फलंदाजांच्या एलीट क्लबमध्ये दाखल झाला आहे. विराटने भारतातील पाच प्रमुख कसोटी सामन्यांचे केंद्र असलेल्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्लीच्या मैदानावर कसोटी शतक करण्याचा पराक्रम गाजवला आहे. यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडूलकर यांनी असा पराक्रम गाजवला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...