आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे विराटचे वडिलोपार्जित घर, दिल्लीचा नाही तर मध्यप्रदेशचा आहे कोहली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटचे वडिलोपार्जित घर... - Divya Marathi
विराटचे वडिलोपार्जित घर...

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने सर्वात झपाट्याने 9000 धावा पूर्ण करून सचिन आणि सौरव गांगुलीचा विक्रम मोडीस काढला. न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकूण मालिकावीर ठरलेल्या कोहलीने आपणच विराट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. या निमित्त DivyaMarathi.com आपल्याला विराट कोहलीच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगत आहे.घरात विराटचे नाव 'चिकू'
 
> जगभरात विराट नावाने ओळखल्या जात असला तरीही या खेळाडूला घरात चिकू म्हटले जाते. त्यातही महत्वाचे म्हणजे, तो दिल्लीचा असल्याचे सर्वत्र सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात तो दिल्लीचा नसून मूळचा मध्यप्रदेशातील कटनी येथून आहे. विराटचे काका काकू आणि चुलत भावंडे आजही याच शहरात राहतात. आपल्या कामात व्यस्त असल्याने विराट कित्येक वर्षांपासून यांची भेट घेऊ शकला नाही. 2005 मध्ये आपल्या चुलत भावाच्या मृत्यूनंतर तो या शहरात आला होता.

> विराट कोहलीच्या काकू आशा कटनी शहराच्या माजी महापौर आहेत. भारताच्या फाळणीनंतर विराटचे आजोबा कटनी येथे स्थायिक झाले होते. विराटचे वडील प्रेम कोहली याच शहरातील शाळेत शिकले आहेत. येथून ते सारंगपूर आणि त्यानंतर दिल्लीत शिफ्ट झाले.अजुनही संपर्कात आहे कुटुंब
 
कोहलीचे काका गिरीश कोहली यांनी सांगितल्याप्रमाणे, विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला तेव्हापासून त्यांचे दोन तीन वेळा बोलणे झाले आहे. विराट आता सेलिब्रिटी बनला आहे. त्याला बोलण्यासाठी आम्हाला कुटाणे करत बसावे लागतात. त्यामुळे, आम्ही त्याला काही त्रास देत नाही. तरीही विराटचा मोठा भाऊ विकास आणि त्याच्या आईच्या संपर्कात आहोत.बहिणीच्या लग्नातही नव्हता विराट


गिरीश यांनी सांगितल्याप्रमामे, विराटचे वडील 15 वर्षांपासून नैरोबीत राहत आहेत. दिल्लीत विराटच्या वडिलांनी बिझनेस सुरू केला होता. तो आता त्यांचा मोठा मुलगा विकास सांभाळत आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. विराट न्यूझीलंड दौऱ्यामुळे लग्नात सहभागी होऊ शकला नव्हता. विराटची चुलत भावंडे सुद्धा विराटचे फॅन आहेत. मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे त्याचे चुलत भाऊ विराटसारखीच हेअर स्टाइल ठेवतात.या कारणामुळे शिफ्ट केले घर


विराट कोहली आता दिल्लीहून गुडगाव (गुरूग्राम) शिफ्ट झाला आहे. त्याच्या काकू आशा यांनी सांगितल्याप्रमाणे, कोहलीला पश्चिम विहार येथील घरातून विमानतळ आणि इतर ठिकाणी जाणे कठिण जात होते. त्यामुळे, त्याने दिल्ली सोडून गुडगाव स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर पाहा विराटच्या फॅमिलीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...