आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व क्रिकेट सामन्यांसाठी विराट कोहली कर्णधार, पंत यष्टिरक्षक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली. विश्वचषकानंतर संघाचा हा पहिला दौरा आहे. विराट कोहलीला कर्णधार व रोहित शर्माला उपकर्णधार केले आहे. महेंद्रसिंह धोनी पूर्ण दौऱ्यातून तर जसप्रीत बुमराहला एकदिवसीय व टी-२० तून विश्रांती दिली आहे. भारतीय संघ दौऱ्यात तीन टी-२०, तीन वनडे व दोन कसोटी सामने खेळेल. विंडीज दौऱ्यासाठी सर्व प्रकारातील खेळासाठी यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतची निवड केली आहे. संघात राहुल चाहर व नवदीप सैनी नवे चेहरे असतील. राहुलला त्याचा भाऊ दीपक चाहरसोबत टी-२०मध्ये संधी मिळाली आहे. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी मिळाली नाही. वृद्धिमान साहाला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.


बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते प्रसाद यांनी धोनीचा संघात समावेश न केल्याबद्दल सांगितले की, तो या दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता. आम्ही टी-२० विश्वचषकाची तयारी लक्षात घेता संघ निवड केली आहे. आम्ही पंतला आणखी संधी देऊ इच्छितो. सध्या आमची अशी रणनीती आहे. शनिवारी बीसीसीआयने सांगितले होते की, धोनी स्वत: या दौऱ्यात सहभागी होऊ इच्छित नाही, तो पुढील दोन महिने भारतीय लष्कराला देऊ इच्छितो.

 

रायडूला तंदुरुस्तीमुळे विश्वचषकासाठी निवडले नाही : प्रसाद यांनी रायडूची विश्वचषकात निवड न झाल्याबद्दल सांगितले की, आम्ही रायडूला टी-२० तील कामगिरीच्या आधारावर विश्वचषकासाठी निवडले होते. मात्र, त्याच्याबाबत  आम्ही काही विचार केला हाेता. त्यानंतर तो आवश्यक तंदुरुस्तीच्या टेस्टमध्ये फेल झाला. याच कारणास्तव त्याची संघात निवड केली नाही.
 

 

टी-२० मालिका वेळापत्रक
> पहिला सामना : ३ ऑगस्टला फ्लोरिडाच्या ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियमच्या टर्फ मैदानावर खेळला जाईल.
>  दुसरा सामना : ४ ऑगस्टला याच मैदानावर खेळला जाईल.
>  तिसरा सामना : ६ ऑगस्टला प्रॉव्हिडन्सी स्टेडियम गुयाना(वेस्ट इंडीज)मध्ये खेळला जाईल.