Home | Maharashtra | Mumbai | virat kohli clarification over his leave india remark

'रंग दे बसंती'चा अॅक्टरने विराट कोहलीवर केली टिका, म्हणाला - बोलण्यापुर्वी विचार करत जा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 11:51 AM IST

टिका झालेली पाहून विराटने दिले स्पष्टीकरण

 • virat kohli clarification over his leave india remark

  मुंबई. देश सोडण्याच्या वक्तव्याविषयी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीवर 'रंग दे बसंती' आणि 'चश्मे बद्दूर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या सिध्दार्थने टिका केली आहे. सिध्दार्थने ट्वीट करत विराट कोहलीचे स्टेटमेंट मुर्खतापुर्ण असल्याचे म्हटले आहे. त्याने लिहिले की, "जर तुम्हाला किंग कोहली राहायचे आहे तर ती वेळ आली आहे, जर तुला काहीही बोलण्यापुर्वी विचार कर की द्रविड काय म्हणतील? एका भारतीय कर्णधाराकडून कसे मुर्खतापुर्ण शब्द आले आहेत."


  If you want to remain #KingKohli it may be time to teach yourself to think 'What would Dravid say?' before speaking in future. What an idiotic set of words to come from an #India #captain!
  — Siddharth (@Actor_Siddharth) November 8, 2018

  प्रकरण नेमके काय?
  - कोहलीने सोमवारी आपल्या 30 व्या वाढदिवशी 'विराट कोहली ऑफिशियल अॅप' लॉन्च केले होते. या दरम्यान एका फॅनने त्याला बोलताना भारतीयटीमऐवजी इग्लँड आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमला महत्त्व दिले होते. फॅनने लिहिले होते की, "तो (विराट) एक क्षमतेपेक्षा जास्त मोठा मानला गेलेला फलंदाज आहे. मला त्याच्या फलंदाजीमध्ये काहीच खास दिसत नाही. मी या भारतीयांच्या तुलनेत इग्लँड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पाहणे पसंत करतो."
  - यावर कोहली म्हणाला होता की, तो या टिकेमुळे वयक्तितरित्या दुखावत नाही. पण भारतात राहून जर कुणी भारतीय खेळाडूंना पसंत करत नसेल तर त्यांनी देशात राहू नये. तो म्हणाला होता की, "मला नाही वाटत की, तुम्ही भारतात राहिले पाहिजे, जा दुसरीकडे कुठे जाऊन राहा. तुम्ही का या देशात राहतात आणि दूस-या देशांना पसंती दर्शवतात? तुम्हाला माझा खेळ आवडत नाही, यावर मला अजिबात आक्षेपत नाही."
  - तो पुढे म्हणाला होता की, "मला नाही वाटत की, तुम्ही या देशात राहून दूस-या गोष्टींना पसंत करावे. तुमच्या प्राथमिकता सुधारा." कोहली हा विंडीजच्या विरुध्द पाच वडने सीरीजमध्ये सचिन तेंडूलकरला मागे टाकत सर्वात लवकर 10 हजार रन बनवणाचा फलंदाज बनला होता.

  चर्चा झाली तर दिले स्पष्टीकरण
  - वक्तव्य दिल्यानंतर टिका झाली. यानंतर विराटने ट्विट करुन स्पष्टीकरण दिले. त्याने लिहिले की, "मला वाटते की, ट्रोलिंग करणे माझ्यासाठी नाही मित्रांनो, मी स्वतः ट्रोल झाल्याने संतुष्ट आहे." तो म्हणाला की, "मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की, 'या भारतीयांना' कसे त्या कमेंटमध्ये लिहिण्यात आले होते, बाकी काही नाही. मी सुध्दा स्वातंत्र्य असावे याच्याशी सहमत आहे. मित्रांनो सनांचा आनंद घ्या आणि शांत राहा. सर्वांना प्रेम"

Trending