Cricket Special / विराट कोहलीने रचला इतिहास; एका दशकात 20 हजार रन बनवणारा पहिला फलंदाज


कोहलीने विंडीजविरुद्ध 114 रनाची जोरदार खेळी केली

दिव्य मराठी वेब

Aug 16,2019 05:07:43 PM IST

स्पोर्ट डेस्क- भारतीय कर्णधार विराट कोहलीने वेस्टइंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या सीरीजच्या तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद 114 रनाची जोरदार खेळी केली. हे त्याच्या करिअरमधील 43वे शतक आहे. आता कोहली एका दशकात 20 हजार रन बनवणारा पहिला कर्णधार बनला आहे. त्याने 2010 च्या दशकात 20018 रन काढले. कोहलीने एका दशकात सगळ्यात जास्त रन काढण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोटिंगचे रिकॉर्ड मोडीत काढले. पोंटिंगने 2000 च्या दशकात 18962 रन काढले आहेत.


कोहलीने वेस्टइंडीजमध्ये चौथे शतक मारले. तो आता विंडीजमध्ये सगळ्याज जास्त 4 शतक लावणारा फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मॅथ्यू हेडनचा रेकॉर्ड मोडला. हेडनने 3 शतक लगावले होते. दक्षिण अफ्रीकेचा माजी खेळाडू हाशिम अमला आणि इंग्लंडचा जो रूटच्या नावेही 3-3 शतक आहेत.


भारतच्या तीन फलंदाजांनी एका दशकात 15 हजारपेक्षा अधिक रन बनवले
भारतासाठी कोहलीशिवाय इतर दोन फलंदाजांनी एका दशकात 15 हजार पेक्षा जास्त रन काढले आहेत. सचिन तेंदुलकरने 2000 च्या दशकात 15962 आणि राहुल द्रविडने त्याच दशकात 15853 रन काढले आहेत. एका दशकात 15 हजारपेक्षा जास्त रन काढण्याच्या बाबतीत भारताचे 3, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रीकेचे 2-2 आणि ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाचा समावेश आहे.

कर्णधार म्हणून जास्त शकत लावणारा दुसरा फलंदाज
वनडेमध्ये कर्णधार म्हणून कोहलीने 21वे शतक ठोकले. यात तो दुसऱ्या स्थानावर आहे. कर्णधारपदी राहून त्याच्यापेक्षा जास्त शकत रिकी पोंटिंगने लगावले आहे. रिकीने 22 शतकासाठी 220 सामने खेळले. कोहलीने फक्त 76 सामन्यात 21 शतक लगावले.

X
COMMENT