मलिंगाचा शेवटचा बॉल 'नो-बॉल' होता पण अंपायरने बघितले नाही : या निर्णयाबाबत कोहलीने दर्शविली नाराजी

दिव्य मराठी वेब टीम

Mar 29,2019 02:02:00 PM IST


स्पोर्ट डेस्क - गुरुवारी आयपीएलच्या 8 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुला शेवटच्या चेंडूंवर 7 धावांची आवश्यकता होती. तत्पूर्वी फलंदाजांनी मलिंगाच्या सुरुवातीच्या पाच चेंडूंवर 10 धावा काढल्या होत्या. शेवटचा चेंडूवर सात धावांची गरज होती. शिवम दुबे स्ट्राइकवर होता. त्याने जर षटकार ठोकला असता तर हा सामनी अनिर्णित झाला असता. पण असे झाले नाही. मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या चेंडूचा रिप्ले बघितल्यानंतर या सामन्याच्या निकालावर वाद उठला. मलिंगाने शेवटचा चेंडू नो बॉल फेकला होता. त्याचा पाय क्रीजच्या बाहेर होता. पण अंपायरला मात्र ते दिसले नाही.


खेळाडूंशी हात मिळवणी करण्यास इच्छुक नव्हता कोहली
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने अंपायरच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. तो रागाच्या भरात कोणत्याही खेळाडूसोबत हात मिळवणी करण्यास इच्छुक नव्हता. तो म्हणाला की,'आपण आयपीएल खेळत आहोत, क्लब क्रिकेट नाही. अंपायरने आपले डोळे उघडे ठेवायला हवेत. हा निर्णय खरच खूप चुकीचा होता.'

रोहित शर्माने दर्शविली नाराजी, म्हणाला - हे क्रिकेसाठी योग्य नाही.

फक्त कोहलीच नाही तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने देखील या निर्णयाबाबत नाराजी दर्शवली आहे. तो म्हणाला की,'शेवटा चेंडू नो बॉल असल्याचे सामना संपल्यानंतर माहीत झाले. अशाप्रकारचे निर्णय क्रिकेटसाठी योग्य नाहीयेत. बुमराहचा एक चेंडून वाइड सुद्धा वाइड नव्हता. पण याबाबत खेळाडू जास्त काही करू शकत नाहीत'.

X
COMMENT