आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्मासाठी पती विराट कोहलीने प्लान केला डिनर, कुटूंबासोबत घालवत आहे वेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहे. तो बायको आणि कुटूंबासोबत दिल्लीच्या रेस्तरॉमध्ये रविवारी डिनर करताना दिसला. विराटने अनुष्कासाठी स्वतःचे रेस्तरॉ नुएवामध्ये डिनर प्लान केला होता. या निमित्ताने अनुष्का ब्लॅक टॉप आणि जीन्समध्ये सिंपल लूकमध्ये दिसली. विराटने डिनर करतानाचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, 'Great lunch today at @nueva.world, food was outstanding and company couldn't have been better. ❤ Great place for food lovers like us. 😋👌 #Favourite #Nueva
PS- Don't miss the chimichuri mushrooms! 😀'.

 

अनुष्काचे दिर-जाऊही होते सोबत 
अनुष्कासोबत डिनरवर तिचे दिर-जाऊ म्हणजेच विकास कोहली आणि चेतनाही दिसले. त्यांच्यासोबत अजुन एक कपल होते. सध्या विराट कोहली आपले कुटूंब आणि पत्नीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. त्याला दुबईमध्ये खेळल्या जाणा-या एशिया कप 2018 मधून आराम दिला जात आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्मा टीमची कॅप्टनशीप पाहत आहे. 
- अनुष्का शर्माच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट 'सुई धागा- मेड इन इंडिया' आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर शरत कटारिया आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...