Worldcup2019 / WorldCup2019/ कोहलीवर लागला सामन्यातील फीसपैकी 25% दंड, अफगानिस्तानविरूद्ध मॅचमध्ये अपांयरशी हुज्जत घालणे पडले महागात

जसप्रीत बुमराहचा चेंडू फलंदाज रहमतच्या पायावर लागला होता

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 06:00:00 PM IST

स्पोर्ट डेस्क- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आईसीसी)ने विराट कोहलीला आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी करार केले आहे. शनिवारी अफगानिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात अनावश्यक अपील केल्यामुळे कोहलीवर त्याच्या सामन्यातील फीसच्या 25% दंड भरावा लागणार आहे. कोहली आयसीसीच्या कलम धारा 2.1 अंतर्गत दोषी करार दिला गेला आहे. सामन्यात भारताने अफगानिस्तानला 11 रनाने पराभुत केले.


अफगानिस्तानच्या इनिंगच्या वेळी 29व्या ओव्हरमध् जसप्रीत बुमराहचा चेंडू फलंदाज रहमतच्या पायावर लागला होता. यावेळी विराटने अंपायर अलीम डारज्या जवळ जाऊन आक्रमक पद्धतीने एलबीडब्ल्यूची अपील केली. विराटने मॅच रेफरी क्रिस ब्रॉडसमोर आपली चुकी कबुल केली आहे, त्यामुळे प्रकरणात सुनावणीची गरज पडली नाही. कलम 2.1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी सामन्यातील फीसच्या 50% दंड आकारला जाऊ शकतो. त्यासोबतच खेळाडूला एक डिमेरिट पॉइंटही दिला जातो.

कोहलीला मिळाला डिमेरिट पॉइंट
फील्ड अंपायर अलीम डार, रिचर्ड इलिंगवर्थ, थर्ड अंपायर रिचर्ड कॅटलबरो आमि फोर्थ अंपायर मायकल गॉफने कोहलीला दोषी करार देत दंड त्याच्यावर दंड लावला. रेफरीने कोहलीला एक डिमेरिट पॉइंटदेखील दिला आहे. आता कोहलीकडे दोन डिमेरिट पॉइंट झाले आहेत. त्याला मागील 15 जानेवारीला दक्षिण अफ्रीकेविरूद्ध खेळलेल्या टेस्ट मॅचमध्येही एक पॉइंट मिळाला आहे.

काय आहे डिमेरिट पॉइंट?
एखाद्या खेळाडूला 24 महीन्यांच्या आथ चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट पॉइंट मिळतात, तेव्हा त्याच्यावर एक प्रतिबंध पॉइंट होत असतो. जर खेळाडूकडे दो प्रतिबंध पॉइंट झाले, तर त्याच्यावर एक टेस्ट किंव दोन वन-डे किंवा दोन टी-20(जे आधी येतात ते) सामन्यांची बंदी लावली जाते.

X
COMMENT