आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झिरो' सिनेमाची स्तुती केल्यामुळे ट्रोल झाला विराट, फॅन्सने उडवली खिल्ली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टेस्ट सीरीजचा तिसरा मॅच मेलबर्न ग्राउंडवर बॉक्सिंग-डेच्या दिवशी म्हणजेच (26 डिसेंबर) पासून सुरू होणार आहे. दोन्ही संघाने सध्या 1-1 ची बरोबरी केली आहे, त्यामुळे तिसरा मॅच खुप रोमांचकारी असेल यात काही शंखा नाही. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली नुकतेच त्याची पत्नी अनुष्काचा सिनेमा 'झिरो' पाहून आला.

 

अनुष्काच्या फॅनने सिनेमा पाहून थिएटरच्या बाहेर येत असलेल्या विराटचा एक छोटासा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला, जो खुप व्हायरल होत आहे.

 

सिनेमा पाहून आल्यानंतर त्याने सिनेमाबद्दल त्याचे मत सांगितले. त्याने ट्विटरवर एक ट्विट केले की, ' झिरो पाहून खुप छान वाटल. मला सिनेमा खुप आवडला आहे, सगळ्या कलाकारांनी चांगले काम केले आहे. अनुष्काचा अभिनय मला खुप आवडला, तिचा रोल खुप चॅलेंजिंग होता.' 

 

भले विराटला हा सिनेमा आवडला असेल पण फॅन्सना हा सिनेमा खुप हल्का वाटला आहे. शाहरुख, अनुष्का आणि कॅटरीनाने खुप निराशा केली असे फॅन्सचे मत आहे.

 

Saw @Zero21Dec and loved the entertainment it brought. I enjoyed myself. Everyone played their parts well. Loved @AnushkaSharma performance because I felt it was a very challenging role and she was outstanding. 👌👌

— Virat Kohli (@imVkohli) December 23, 2018

विराटच्या या रिव्ह्यूनंतर फॅन्सनी त्याला खुप ट्रोल केले आहे. एका फॅनने लिहीले,' खोट का बोलत आहेस?' तर एकाने लिहीले,' बायकोच्या सिनेमाला कोण वाईट म्हणेल.'   

बातम्या आणखी आहेत...