आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Receives Rajiv Gandhi Khel Ratna Award From President Ram Nath Kovind

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : कोहली, चानू यांना खेलरत्न पुरस्कार तर हिमा दासचा अर्जुन पुरस्काराने गौरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर अॅथलिट हिमा दास हिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. 

#WATCH: Indian skipper Virat Kohli receives Rajiv Gandhi Khel Ratna Award from President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan in Delhi. pic.twitter.com/wqBKArEOJ3

— ANI (@ANI) September 25, 2018

एशियाडमुळे सप्टेंबरमध्ये केले पुरस्कार वितरण 

दरवर्षी हे पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे 29 ऑगस्टला दिले जात होते. पण यंदा एशियाडमुळे या पुरस्कारांचे वितरण सप्टेंबर महिन्यात करण्यात आले.  

 

अर्जुन पुरस्कार
नीरज चोप्रा (भालाफेक), जिन्सन जॉनसन आणि हिमा दास (अॅथलेटिक्स), एन सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृति मंधाना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रित सिंह आणि सविता (हॉकी), रवी राठोड (पोलो), राही सरनोबत, अंकुर मित्तल आणि श्रेयसी सिंह (नेमबाजी), मणिका बत्रा आणि जी साथियान गणशेखरन (टेबल टेनिस), रोहन बोपन्ना (टेनिस), सुमित (कुस्ती), पुजा केडिया (वुशू), अंकुर धामा (पॅरा-अॅथलेटिक्स), मनोज सरकार (पॅरा-बॅडमिंटन)

 

द्रोणाचार्य पुरस्कार
सी.ए. कुट्टप्पा (बॉक्सिंग), विजय शर्मा (वेटलिफ्टिंग), ए श्रीनिवास राव (टेबल टेनिस), सुखदेव सिंह पन्नू (अॅथलेटिक्स), क्लेरेंस लोबो (हॉकी), तारक सिन्हा (क्रिकेट, आजीवन), जीवन कुमार शर्मा (ज्युदो), व्ही.आर.बीडू (अॅथलेटिक्स, आजीवन)


ध्यानचंद पुरस्कार
भरत कुमार क्षेत्री (हॉकी), बॉबी अलॉयसियस (अॅथलेटिक्स),  चौगले दादू दत्तात्रेय (कुस्ती)


तेनजिंग नॉर्गे नेशनल अॅडव्हेंचर अवार्ड
अंशुल जम सेनपा (गिर्यारोहक), स्वर्गीय रवी कुमार (गिर्यारोहक), सागर परिक्रमा करणाऱ्या लेफ्टिनंट कमांडर वर्तिका जोशी आणि त्यांची टीम (नौकायन), कॅप्टन उदित थापर (स्काय डायव्हींग)

 

बातम्या आणखी आहेत...