आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू आहे. त्याचे सरावाचे सुत्र व शिस्त त्याला जगातील सर्वात उत्कृष्ट खेळाडूंमध्ये घेऊन जाते. त्याचा काही निवडक उत्साही क्षेत्ररक्षकात समावेश असून त्याची खेळपट्टीवर धाव घेण्याची क्षमता इतर खेळाडूंना प्रेरणा देते. कोहलीने म्हटले होते, तंदुरुस्त फलंदाज धाव घेताना एका धावेचे दुहेरीत रूपांतर करतो. तेव्हा विरोधी संघातील खेळाडूवर दबाव वाढतो. तंदुरुस्त क्षेत्ररक्षक अवघड झेल घेण्यासाठी स्वत:ला अधिक झोकून देतो. कोहली रिकाम्या वेळेत फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करतो. त्यासाठी जिममध्ये घाम गाळतो. कारण मैदानावर २०० टक्के अधिक देऊ शकतो. त्याची तंदुरुस्ती जगातील उत्कृष्ट दाेन फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो व लियोनेल मेसीसारखी आहे.
भारताचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसादने कोहलीचे कौतुक करताना म्हटले की, कोहली आल्यानंतर टीम इंडियाच्या तंदुरुस्तीत मोठा फरक पडला. प्रसादने एका मुलाखतीत म्हटले की, कोहली सामन्यात जेव्हा चांगली खेळी करतो तेव्हा ताे सरासरी १७ किमी पळतो. दुसरीकडे, एक फुटबॉलपटू सरासरी ८ ते १३ किमी धावतात. विराट कोहली हा यादरम्यान फुटबाॅलपटू क्रिस्टियानाे रोनाल्डो व बार्सिलाेनाच्या लियाेनेल मेसीपेक्षा दुपटीने धावतो. रोनाल्डो ९० मिनिटांच्या एका सामन्यात ८.३८ किमी आणि मेसी ७.६ किमी धावतो. यावरून त्याची मेहनत अधिक असल्याचे दिसते.
बीसीसीआयचे फिजिओ सरावाचे नियोजन करतात
प्रसाद यांनी म्हटले की, ज्या खेळाडूंचा बीसीसीआयशी करार आहे त्यांना जीपीएस तंत्राने
सराव आणि ट्रॅकिंग विश्लेषण तंत्राने जोडले जाते. कारण त्यांच्या सरावाची माहिती मिळते. फिजिअो त्या माहितीच्या आधारे टीम व खेळाडूंच्या सरावाचे नियोजन करातात. सर्व संघ असे करतात. ही पद्धत संघाचे ट्रेनर शंकर बासू घेऊन आले होते. ते त्याप्रमाणेच नियोजन करतात.
मीदेखील धोनीचा मोठा चाहता आहे
या महिन्याच्या अखेरीस निवड समितीपदावरून निवृत्त होत असलेल्या प्रसाद यांनी तेदेखील धोनीचे खूप मोठे चाहते असल्याचे म्हटले. धोनीने भारतीय संघाला विश्वचषक, चॅम्पियन ट्रॉफी व कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले आहे. त्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्याच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तो स्वत:च निर्णय घेईल. निवड समिती म्हणून आम्हाला आपले काम करावे लागते आणि नव्या दमाच्या खेळाडूंना संधी द्यावी लागते. दुसरीकडे, रायडूला विश्वचषकाच्या संघात निवड न झाल्यावर म्हटले की, मला रायडूबाबत खूप वाईट वाटते. हा निर्णय खूप कठीण होता. आम्ही रायडूच्या फिटनेसवरदेखील लक्ष दिले होते. आम्ही एक महिन्यापर्यंत एनसीएत त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष दिले व मदत केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.