आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड सामना : महत्वाच्या वेळी विकेट गमावल्याने झाला पराभव, आमचे फलंदाज वेगवाग धावा काढण्यात अपयशी; विराट कोहली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - आयसीसी विश्वचषकात भारताला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. यावर उत्तर देत कर्णधार कोहली म्हणाला की, सपाट खेळपट्टीवर खेळाडू उत्तम फलंदाजी करू शकले नाही. लक्ष्याचा पाठलाग धावा काढताना फलंदाजांना अपयश आले. पुढे बोलताना तो म्हणाला की, आम्ही महत्वाच्या वेळी गडी गमावले नसते तर त्याचा परिणाम वेगळाच झाला असता.  


विराट म्हणाला की, 'इंग्लंडच्या गोलंदाजांननी उत्तम गोलंदाजी केली. पण पंत आणि पांड्या क्रीजवर होते तेव्हा आमच्यासाकडे एक उत्तम संधी होती. पंत-पंड्यांचा खेळ आम्हाला लक्षाजवळ घेऊन गेला असता. पण चुकीच्यावेळी आमचे गडी बाद झाले आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्कारावा लागला.'

 

बाउंड्रीसाठी धोनीने केली मेहनत

महेंद्र सिंह धोनीच्या फलंदाजीविषयी विचारले असता विराट म्हणाला की, 'धोनीने बाउंड्री घेण्यासाठी खूप मेहनत घेतली असे मला वाटते. पण परिस्थिती अनुकूल नव्हती. प्रतियोगी संघ योग्य ठिकाणी गोलंदाजी केली. यामुळे शेवटी फलंदाजी करणे कठीण झाले. आता आम्हाला पुढील सामन्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच आजच्या सामन्यात झालेल्या चुकांत सुधारणा करावी लागणार आहे.'


लहान खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी जास्त संधी नव्हती

गोलंदाजांचा बचाव करत कोहली म्हणाला की, बर्मिंघममध्ये बाउंड्रीलाइन फक्त 59 मीटर होती. सोबतच सपाट खेळपट्टी ठेवण्यात आली होती. अशात फलंदाज रिर्व्हस स्वीपने षटकार मारू शकतात. अशा परिस्थीत फिरकीपटू काही विशेष करू शकत नाहीत. इंग्लंड 360 धावा करण्याच्या दिशेने पुढे चालला होता. पण आम्ही त्यांना रोखले.