आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे मांसाहार सोडून शाकाहारी बनले विराट-अनुष्का, घेत आहेत ही खास डायट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क: विराट कोहली आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहतो. मीडिया रिपोर्टनुसार, त्याने गेल्या चार महिन्यांपुर्वीच अॅनिमल प्रोटीन घेणे बंद केले आहे. तर आपली फेव्हरेट बिर्याणी, बटर चिकन आणि अंड्यांसोबत डेअरी प्रोडक्स म्हणजेच दूध, पनीर खाणे बंद केले आहे. एकंदरीत ते वेगन डायट फॉलो करत आहेत. रिपोर्टनुसार या डायटमुळे विराटला खेळात फायदा झाला आहे. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही ही डायट फॉलो करत आहे.

वेगन डायट काय आहे? याचे काय फायदे होतात? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणुन घेण्यासाठी आम्ही अटल बिहारी वाजपेयी मेडियकल कॉलेज, विदिशाचे सर्जरी विभागाचे डॉक्टर नीरज जैन (MS जनरल आणि लैप्रोस्कोपिक सर्जन)सोबत बातचित केली आहे. त्यांनी या डायट संबंधीत सर्व गोष्टी बारकाईने सांगितल्या आहेत.

 

काय आहे वेगन डायट?
वेगन डायटचा अर्थ पुर्णपणे शाकाहारी असणे असा होतो. या डायटमध्ये हिरव्या भाज्यांसोबत फळं आणि नट्सचा समावेश असतो. वजन कमी करणा-या लोकांसाठी हे बेस्ट डायट आहे. यामधून बॉडीला कॅलरी मिळतात, परंतु फॅट जमा होत नाही. वेगनमध्ये फायबर आणि प्रोटीन दोन्हींचा समावेश असतो. म्हणजेच कमी मेहनत करुनही जास्त फळ मिळते. 

नॉनव्हेज डायटमध्ये प्रोटीन कंटेट खुप जास्त असते. तर फायबर नसते. या स्थितीमध्ये मेटाबॉलिज्मनंतर जे वेस्ट प्रोडक्स असतात. ते बॉडीमध्ये दिर्घकाळ रिटेन राहतात. तर दूसरीकडे शाकाहारमध्ये फायबर जास्त असते. मेटाबॉलिज्मनंतर यामध्ये वेस्ट प्रोडक्ट कमी असते. यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होत नाही. यामुळे व्यक्ती पुर्णपणे निरोगी राहतो आणि त्याचे आयुष्यमान वाढते. 


नॉनव्हेज तयार करताना कार्बन जास्त निघते, तर व्हेजमध्ये याचे प्रमाण कमी असते. डॉक्टर नीरज सांगतात की, महिन्यातून एक दिवस उपवास ठेवावा. या दरम्यान फक्त पाणी प्यावे. यामुळे मेटाबॉलिज्म चांगले होते. 

 

वेगन डायट प्लानमध्ये समाविष्ट आहेत 5 गोष्टी 


1. हिरव्या भाज्या 
हिरव्या भाज्यांमध्ये लो फॅट कॅलरी असतात. यामुळे हे लठ्ठपणा कमी करण्यात खुप महत्त्वाची मानली जाते. या प्रकारच्या पदार्थांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामध्ये मॅग्नेशियम खुप जास्त असते. तर आयरन आणि कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते. 
2. बीन्स आणि डाळी 
बीन्स, सोयाबीन्स, ब्लॅक बीन्समध्ये फायबर आणि सॅच्यूरेटेड फॅट असते. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. तर डाळींमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असते. हे शरीरात ग्लूकोज पचवण्यात मदत करतात. यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले असते. कॅलरीही कमी होतात. 
3. फळं 
पपई, सफरचंद, केळी, टरबूज आणि दूस-या फळांमध्ये कॅलरी कमी असतात. हे वजन कमी करण्यात फायदेशीर असते. वेगन डायट प्लानमध्ये यांचा समावेश असणे खुप गरजेचे असते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि खुप कमी कॅलरी असतात. 
4. धान्य आणि ब्राउन राइस 
धान्यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, आयरन, झिंक, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ईसारखे अनेक पोषक तत्त्व असतात. हे हृदय निरोगी ठेवतात. शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करतात. ब्राउन राइसमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 
5. नट्स 
मनुके, पिस्ता, अक्रोड, बदानसारख्या नट्समध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामधील हेल्दी फॅटमुळे बॉडीमध्ये हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे भूक कमी लागते. नट्समध्ये कॅलरी कमी असतात. हे वजन कमी करण्यात फायदेशीर आहे. 
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...