आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षक पदाच्या निवडीत विराट कोहली करणार नाही हस्तक्षेप, कपिल देवचे पॅनल ठरवेल भारतीय संघाचा नवा कोच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- कपिल देवच्या नेतृत्वातील त्री सदस्यीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक निवडण्याचे काम सोपवले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यात कोणत्याही प्रकराचा हस्तक्षेप करणार नाही. प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 30 जुलै ठेवली आहे. कोच पदाचा शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टाद्वारे ठरवलेली प्रशासकीय समिती (सीओए), स्टीअरिंग कमेटी आणि कपिल देवची कमेटी घेईल. रवी शास्त्रीला 2017 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी निवडले होते.

 


कोहलीने कुंबळेसोबत वाद असल्याचे मान्य केले होते- बीसीसीआय पदाधिकारी
कोहलीने मागील वेळेस रवी शास्त्रीला कोच बनवण्यासाठी कथितरीत्या हस्तक्षेप केला होता. तत्कालीन कोच अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादानंतर त्याने कोच बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनिल कुंबळेने स्वतःहून राजीनामा दिला होता. तेव्हा कोहलीच्या सांगण्यावरूनच सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या क्रिकेट अॅडव्हाइजरी कमेटीने रवी शास्त्री ला कोच म्हणून निवडले होते.


इंडियन एक्सप्रेससोबत झालेल्या चर्चेत बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, "मागच्या वेळेस कोहलीने अनिल कुंबळेसोबत त्याचे आणि संघाचे खटके उडत असल्याचे मान्य केले. पण आता तो नवीन कोस निवडीत हस्तक्षेप करू शकणार नाही. अंतिम निर्णय कपिल देवची कमेटी करेल."


कोचच्या नियुक्तीवर कपिल देवच्या त्री सदस्यीय कमेटीचा निर्णय सर्वमान्य असेल. या निर्णयाला विराटसोबत संघातील प्रत्येक खेळाडूला मान्य करावा लागेल. पण, च्या नावावार शिक्कामोतर्ब सीओएच लावेल. शास्त्रीच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला होता.

बातम्या आणखी आहेत...