आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता टीव्हीवर सुपरहीरोच्या रूपात दिसणार विराट कोहली, मनोरंजनाबरोबरच दिसणार क्रिकेटचे वेड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : क्रिकेटर विराट कोहली लवकरच नव्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. स्टार इंडिया नेटवर्क सुपरहीरो अॅनिमेटड सीरीज 'सुपर व्ही' लॉन्च करणार आहे. ही सीरीज विराट कोहलीपासून प्रेरित झालेली आहे. ज्यामध्ये 'सुपर व्ही' जगाला वाचवताना दिसत आहे. या शोचे प्रीमियर विराट कोहलीच्या वाढदिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला केले जाईल. जे प्रेक्षकांना 'स्टार प्लस', 'स्टार स्पोर्ट्स', 'डिस्नी चॅनल', 'मार्वेल एचक्यू' आणि 'हॉटस्टार' वर पाहू शकतील. 

15 भागांच्या या सीरीजमध्ये कॉमेडी, अॅक्शन आणि ड्रामादेखील पाहायला मिळेल. 15 वर्षांच्या या 'सुपर व्ही' ला क्रिकेटची प्रचंड आवडत असते. या सीरीजबद्दल विराट कोहली म्हणाला, जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मला सुपरहीरोज खूप आवडायचे. अॅनिमेशन छोट्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे एक सर्वात चांगले माध्यम आहे. 'सुपर व्ही' एक रंजक सीरीज आहे, जी आपल्या कथा सांगण्याच्या अनोखी पद्धत आणि गोड पात्रांनी प्रेक्षकांची रुची वाढवेल. हा एक साप्ताहिक शो असेल, ज्याच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी विराट कोहली कथेतील एका मुख्य विषयाचा सारांश सांगून प्रेक्षकांना एक संदेश देणार आहे.