आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli's Duplicate Reached To Audition Of Roadies 18, Surprised By The Contestants

रोडीज 17 चे ऑडिशन देण्यासाठी गेला विराट कोहलीचा डुप्लीकेट, इतर स्पर्धक झाले चकीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रोडीज' टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वात लांब शोपैकी एक आहे

टीव्ही डेस्क- एमटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या रिअॅलिटी शो 'रोडीज 17'चे ऑडिशन सुरू आहे. 7 जानेवारीला चंडीगड ईवेंटमध्ये भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीचा डुप्लीकेट तिथे आल्यामुळे सर्वांचेच लक्ष्य त्याच्याकडे गेले. विराटचा ड्प्लीकेटही तिथे ऑडीशन देण्यासाठी आला होता. 
20 वर्षीय लक्ष्य हूबेहू विराट कोहलीसारखा दिसतो. आपल्या लूकबद्दल सांगताना लक्ष्य म्हणाला की, अनेकवेळा मला विराट समजून लोक माझ्यासोबत सेल्फी घेतात. शोमध्ये येण्याबाबत मी खूप उत्साहीत आहे. मला नेहा धुपिया खूप इंस्पायरिंग वाटते त्यामुळे मला नेहाच्या टीममध्ये जायला आवडेल.

'रोडीज' टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वात लांब शोपैकी एक आहे. हा एक यूथ बेस्ड शो आहे, ज्याची सुरुवात 2003 मध्ये झाली होती. शोचा पहिला विनर अॅक्टर, वीजे रणविजय सिंह आहे. बॉलिवुडचा नॅशनल अवॉर्ड विनर आयुष्मान खुराना 2004 मध्ये विनर बनला होता.