Home | National | Delhi | Virat Kohli's explanation given on the statement of leaving the country

देश सोडण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण

​वृत्तसंस्था | Update - Nov 10, 2018, 09:49 AM IST

यानंतर विराटच्या या वक्तव्यावर टिकेची झोड उठली होती.

  • Virat Kohli's explanation given on the statement of leaving the country

    दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या देश सोडण्याच्या वक्तव्यावरून नाराज प्रेक्षकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला अाहे. तो म्हणाला, सर्वांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तुम्हाला भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना बघणे आवडत नसेल तर तुम्ही देश सोडायला हवा, असे विराटने एका चाहत्याला उत्तर देताना म्हटले होते. यानंतर विराटच्या या वक्तव्यावर टिकेची झोड उठली होती.


    आता आपल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापत आहे, असे बघून विराटने सारवासारव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याने गुरुवारी मला कोणालाही दुखवायचे नव्हते. चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्यात कशाप्रकारे ‘या भारतीय’ शब्दाचा वापर केला होता, आणखी काहीच नाही. मी प्रत्येकाची आवड आणि स्वातंत्र्याचा सन्मान करतो. त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. माझ्या वक्तव्यावर गंभीर न होता दिवाळीसारख्या सणाचा आनंद घ्या. सर्वांसाठी प्रेम व शांती, अशा शब्दांत ट्विट केले.


    विराटने सोमवारी त्याच्या ३० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने विराट कोहली आॅफिशियल अॅप सादर केला. यादरम्यान एका चाहत्याने त्याला चर्चेदरम्यान विराट एक ओव्हर रेटेड फलंदाज आहे. मला त्याच्या फलंदाजीत फारकाही िदसत नाही. मला इंग्लंड व आॅस्ट्रेलियाचे फलंदाज या भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त आवडतात असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना माझ्यावर टिकेचा कोणताही परिणाम होत नाही. परंतु, जर भारतातच राहत असून जर कोणाला भारतीय खेळाडूं आवडत नसतील तर त्याने देश सोडायला हवा, मला असे वाटत नाही की तू भारतात राहावे, असे काेहली म्हणाला होता.

Trending