आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या संघाची जय-पराजयाची सरासरी २.५५; धोनी-सौरवच्या पुढे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय टीमचा प्रवास चांगला राहिला, मात्र वेळेपूर्वी थांबला. विराटचा संघ भारतातील सर्वोत्कृष्ट वनडे संघ बनत आहे, संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर हे ऐकायला विचित्र वाटते. आकडे या गोष्टी स्पष्ट करत आहेत. क्रिकेट जगात वनडे संघांविरुद्ध विराटच्या संघाचे प्रदर्शन कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा सरस आहे. 


येथे मोठे संघ म्हणजे, ज्यांची वनडेतील विजयाची सरासरी सर्वाधिक आहे. यात पाच संघांत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश आहे. या पाच संघांविरुद्ध विराटचा संघ सरासरी प्रत्येक २.५५ सामने जिंकल्यानंतर एखादा सामना गमावतो. या बाबतीत विराट भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीपेक्षा पुढे आहे, ज्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची मोठ्या संघांविरुद्ध जय-पराजयाची सरासरी १.३० होतील. सौरभ गांगुलीचा त्यानंतर क्रमांक लागताे.  क्रिकइन्फोने त्याचा अहवाल तयार केला आहे. 
 

कुलदीप, चहल व बुमराहच्या उपस्थितीमुळे मजबूत 

भारतीय संघातील गोलंदाजी यापूर्वीच्या कोणत्याही संघापेक्षा सरस ठरली आहे, यात कोणतीही शंका नाही. भारतीय टीमच्या वनडे इतिहासात पहिल्यांदा संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. विराट काेहलीला कर्णधार म्हणून मिळत असलेले यश, त्याचे एक कारण आहे. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या उपस्थितीमुळे संघ अधिक मजबूत झाला.

 

>  जय-पराजयाची सरासरी म्हणजे टीमने इतके सामने जिंकल्यानंतर एक सामना गमावला.
> विराटच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन ट्रॉफी फायनल व विश्वचषक उपांत्य सामना गमावला.