Home | International | China | Virtual anchor will read 24 hours on TV: The first experiment in China is happening

टीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग

वृत्तसंस्था | Update - Nov 11, 2018, 10:59 AM IST

व्हर्च्युअल अँकरचा अावाज, ओठांची हालचाल, हावभाव खऱ्या अँकरप्रमाणेच असेल.

  • Virtual anchor will read 24 hours on TV: The first experiment in China is happening
    बीजिंग - चीनने गुरुवारी एक व्हर्च्युअल न्यूज अँकर नेमला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टेक्नॉलॉजीवर काम करणारा हा अँकर न्यूज चॅनल, वेबसाइट व साेशल मीडियासाठी २४ तास बातम्या वाचू शकेल. याला जास्त खर्चही लागत नाही. चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाउंटवर व्हर्च्युअल न्यूज रीडरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्यावसायिक न्यूज अँकर ज्याप्रमाणे बातम्या देतात, त्याच पद्धतीने व्हर्च्युअल न्यूज रीडर काम करेल, असा एजन्सीचा दावा आहे. व्हर्च्युअल अँकरचा अावाज, ओठांची हालचाल, हावभाव खऱ्या अँकरप्रमाणेच असेल.

Trending