बीजिंगमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी चित्रपटांना प्रारंभ; प्रेक्षकांसाठी ३६० अंशांत फिरणाऱ्या खुर्च्या

दिव्य मराठी

Apr 06,2019 10:08:00 AM IST
बीजिंग | चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) चित्रपटाला प्रारंभ झाला आहे. हे चित्रपटगृह २,४७६ चाैरस फूट जागेत उभारण्यात आले आहे. रसिकांना या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ‘फ्युचरिस्टिक’ खुर्च्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये व्हीआर हेडसेट देण्यात आला आहे. व्हीआर हेडसेट लावून प्रेक्षकांना या खुर्च्यांवर बसून चित्रपटाचा वेगळा अनुभव घेता येईल. विशेष म्हणजे या खुर्च्या ३६० अंशांच्या काेनात फिरतात. त्यामुळे नेहमीच्या चित्रपटगृहांच्या तुलनेत व्हर्च्युअल चित्रपट बघताना एक नवा आनंद प्रेक्षकांना मिळताे.
X