आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामा हल्ला : व्हर्च्युअल सिमचा करण्यात आला वापर; अमेरिकेकडे मागितली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जैश-ए-माेहंमदच्या हल्लेखोर तसेच पुलवामा हल्ल्यासाठी व्हर्च्युअल सिमचा वापर केला होता. पाकिस्तान तसेच काश्मीरातील म्होरक्यांनी देखील अशाच प्रकारच्या सिमचा वापर केला होता. या प्रकरणात भारताने अमेरिकेची मदत घेण्याचे ठरवले आहे. व्हर्च्युअल सिम क्रमांक अमेरिकेतील आहे. त्याबद्दलची सखोल माहिती घेण्यात येणार आहे.हे सिम कोणी खरेदी केले होते ? हे तपास अधिकारी शोधणार आहेत. दहशतवादी खोटी ओळख सांगतात. ही बाबही लक्षात घेतली जाणार आहे. दहशतवादी हल्ला झालेल्या घटनास्थळाचा तपास केल्यानंतर त्यात काही पुरावे मिळाले आहेत. त्रालमधील चकमक झालेल्या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस व केंद्रीय सुरक्षा संस्थांनी तपास केला होता. त्यात हल्लेखोर अदिल दार हा जैशच्या सीमेपलिकडील म्होरक्याच्या सतत संपर्कात होता, हे स्पष्ट झाले आहे.  हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर खानचा त्राल येथील चकमकीत खात्मा झाला.
बातम्या आणखी आहेत...