आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आभासी जग तुमच्या नजरेच्या टप्प्यात, दत्तात्रय पार्लेच्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचे आज औरंगाबादेत अनावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : उंच उंच रोलर कोस्टर वरून कधी तिरपे तर कधी उलटे होताना छाती धडधडते आहे, मध्येच मग अंगावर येते, घरात बसून अंतराळात फेरफटका सुरू आहे. गतीची ही आभासी दुनिया सर्वांनाच भुरळ घालत आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टचे हेडसेट म्हणजे खूप महागडे काम. पण मराठमोळ्या मातीतील म्हणजे आपल्या मराठवाड्यातील एका तरुणाने हा सर्व अनुभव वाजवी भावात उपलब्ध करून देण्याची किमया साधली आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट गावच्या दत्तात्रय पार्ले याने बनवलेल्या या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेटचे प्रजासत्ताक दिनी औरंगाबादच्या एमआयटी कॉलेजमध्ये अनावरण होत आहे.
३ डी तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल असलेल्या या आभासी जगाने सगळ्यांनाच मोहिनी घातली आहे.या क्षेत्रातील कंपन्यांचे ब्रँडेड हेडसेट काही हजारांपासून ते लाख रुपयात उपलब्ध आहेत. ते सामान्यांच्या खिशासाठी न परवडणारे आहेत.

या हेडसेटचे निर्मिती करणारे पार्ले म्हणाले, इन्फोसिसमध्ये असताना हे नवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. आधी पुठ्याचा हेडसेट(२०० रु) बनवला. पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन दणकट प्लास्टिकचा हेडसेट(५०० रु.) तयार केला आहे. गावागावात स्मार्टफोन असल्याने हा किफायतशीर हेडसेट सगळ्यांना परवडेल, असा दावा त्यांनी केला. शेतमजुराचा मुलगा असलेल्या पार्लेंनी शिक्षणही दुसऱ्यांच्या मदतीने पूर्ण केले. बीई, एमटेक, पीएचडी संपादन केलेल्या पार्ले यांना ५० पेक्षा जास्त सॉफ्टवेअर अवगत आहेत.

या आहेत किमती

अ‍ॅगमेंटो एव्हीआर व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी बॉक्स २००० रु, सॅमसंग गिअर बॉक्स ४,१३९ रु, व्हीआरके आरके प्लस ११,४८८ रु सोनी प्ले स्टेशन २७,८९० रु मायक्रोसॉफ्ट होलोलेंन्स ३.५ लाख रु, गुगल डे ड्रीम ८००० रु
जागतिक बाजारपेठ : अंदाजे १८० अब्ज डॉलर

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे काय?

आभासी वास्तविकता व्हर्च्युअल म्हणजे आभासी. अमुक गोष्ट तिथे आहे असे वाटणे पण ती तिथे नसते. वास्तव म्हणजे आपण पाहतोय आणि त्याचे खरच वास्तव्य आजुबाजुला आहे, असे वाटणे. ३डी चित्रपटात केवळ पडद्यावर दिसणाऱ्या भागाचा अनुभव मिळतो. मात्र, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये आपण जागच्या जागी राहून थेट आभासी जगात फिरतात, न्याहाळत संवाद साधू शकतो. हा अनुभव घेण्यासाठी युट्युबवर ३६० व्हिडिओ व ३६० फोटो असे लिहून शोध घ्या.

विविध क्षेत्रात उपयोग?

  • पर्यटन स्थळांचा घर बसल्या अनुभव
  • विद्यार्थी इंजिनिअरिंग, शरीराच्या भागांचा आभासी अभ्यास करू शकतात
  • रिअल इस्टेट उद्योगात घर प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची गरज नाही ना सॅम्पल फ्लॅट तयार करण्याची
  • करखान्यात सुरक्षा प्रशिक्षण
  • एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात तेथील जागेचे चित्रीकरण करून त्याची पुन्हा निर्मिती करणे
  • मोठी उत्पादने ग्राहकांपर्यंत नेण्याऐवजी त्याचा आभासी तपशील पोहचवणे शक्य

अनुभव समृद्धी घ्या पण मर्यादेत राहून

रिफ्लेक्टेड लाईटच्या त्रास होत नाही. कारण त्यादृष्टीने डोळ्यांची रचना केलेली असते. प्रकाशाच्या स्रोताकडे बघितले तर डोळे कोरडे पडणे येणे, चष्म्याचा नंबर वाढणे या समस्या येऊ शकतात. त्यामुळे अनुभव समृद्धी मर्यादेत राहून घ्यावी पण विरंगुळ्यासाठी पर्याय बनूवू नये. - डॉ. श्रीरंग देशपांडे, नेत्रतज्ञ, डे केअर क्लिनिक, औरंगाबाद
 

बातम्या आणखी आहेत...