आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virus Attack On 84 Percent Of Computers; 50% Of Indians Do Not Backup Even If Data Is Gone

८४ टक्के कॉम्प्युटर्सवर व्हायरस अटॅक; डेटा गेला तरी ५०% भारतीय बॅकअप घेत नाहीत

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • डेटा सुरक्षेत अयशस्वी ठरली कॅथी पॅसिफिक, ४.६८ कोटींचा दंड
  • २२-३५ वर्षीय तरुणाई डेटा हाताळण्यात पुढे, ८२% बॅकअप घेतात

नवी दिल्ली - भारतीय डेटा प्रायव्हसीबाबत जेवढे जागरूक आहेत, तेवढीच त्यांची डेटा सुरक्षेत निष्काळजीही आहे. प्रत्येक चारपैकी एक भारतीय संगणक वापरकर्त्याने आपला कंटेंट वा डेटा याआधी गमावला आहे. एका नव्या संशोधनात ८४% लोकांनी डेटा गमावण्यामागचे मुख्य कारण व्हायरस अटॅक, सिस्टिम क्रॅश किंवा पासवर्ड विसरणे हे सांगितले. असे असतानाही ५०% भारतीयच डेटा बॅकअप घेत नाहीत. ४०% उत्तर देणाऱ्यांनी सांगितले की, वेळेची कमतरता आणि डेटा बॅकअपची प्रक्रिया खूप थकवा अाणणारी असल्याने त्यांनी डेटा सुरक्षित केला नाही. डेटा स्टोअरेज क्षेत्रात काम करणारी कंपनी वेस्टर्न डिजिटलने आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली.रिसर्च ग्रुपमध्ये सहभागी केवळ २४% महिलांनीच डेटा बॅकअप घेत असल्याचे सांगितले. ३६ ते ४५ वयोगटातील केवळ १८% महिलांनी अशी काळजी घेतली. असे असले तरी हळूहळू ते कंटेंटचे महत्त्व समजून घेत आहेत. बऱ्याचदा लोक आपल्या महत्त्वाच्या आठवणी नेहमीसाठी गमावतात. डेटा सुरक्षित करण्याच्या प्रकरणात तरुणाई जास्त सजग आहे. २२ ते ३५ वयोगटातील ८२% तरुणाई बॅकअप घेतात.डेटा सुरक्षेत अयशस्वी ठरली कॅथी पॅसिफिक, ४.६८ कोटींचा दंड


ब्रिटनचे इन्फाॅर्मेशन कमिश्नर ऑफिस(आयसीओ)ने कॅथी पॅसिफिक एअरलाइन्सवर ४.६८ कोटी रुपयांचा दंड लावला . एअरलाइनवर ग्राहकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित न ठेवल्याचा आरोप होता. एअरलाइन्सच्या संगणक प्रणालीतून १,११,५७८ ब्रिटिश नागरिक आणि ९४ लाख अन्य देशांच्या लोकांची खासगी माहिती, जन्मदिन, फोन नंबर, पत्ता, ट्रॅव्हल हिस्ट्री होती.
 

बातम्या आणखी आहेत...