आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo- महिलेचा पाठलागच नव्हे, तर एकटक पाहणेही ठरतो गुन्हा, असे आहेत स्त्रियांचे अधिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखा गाईडलाइन- काही दिवसांपूर्वी माजी मिस इंडिया तसेच अॅक्ट्रेस तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आता तनुश्रीनंतर अनेक महिलांनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराच्या घटना सोशल मीडियावरून सांगण्यास सुरुवात केली आहे. आज देशभरातून #MeToo वर चर्चा होत असताना अनेक महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशाखा गाइडलाइन बनवण्यात आली आहे.

 

विशाखा गाइडलाइनचे महत्त्वाचे मुद्दे
> महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे किंवा तसा प्रयत्न करणे, तिच्याकडे वाईट नजरेने बघणे, लैंगिक संबधांची मागणी करणे, अश्लील टिप्पणी करणे, लैंगिक इशारे करणे, अश्लील मेसेज किंवा जोक पाठवणे, पॉर्न फिल्म दाखवणे या सर्व गोष्टी लैंगिक अत्याचारांमध्ये येतात.  
> 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) असणे अनिवार्य आहे.
> या समितीची अध्यक्षा ही महिला असावी. समितीमध्ये जास्त संख्या ही महिलांची असावी. त्याशिवाय लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या संस्थांमधील एक महिला या समितीमध्ये असणे आवश्यक आहे.
> संस्थेमध्ये काम करणारी कोणतीही महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार समितीकडे करू शकते. त्याची चौकशी ही कमिटी करणार आणि 90 दिवसांच्या आत त्याचा रिपोर्ट सादर करणार. 
> याशिवाय ती संस्था तक्रार करणाऱ्या महिलेवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही, किंवा समितीमध्ये असलेल्या कोणत्याही सदस्याला दबावात आणण्याचा प्रयत्न करणार नाही.
> या समितीला आपल्या तपासात एखादा दोषी आढळून आला, तर त्याच्यावर भादंविच्या कलमाअंतर्गत कार्यवाही केली जाईल.
> सगळ्या संस्थांमध्ये समितीला प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा लेखा-जोखा  आणि समितीच्या कार्यवाहीचा रिपोर्ट सरकारकडे पाठवणे बंधनकारक आहे.
> जर ती महिला या विशाखा समितीने दिलेल्या निर्णयाने समाधानी नसेल तर पोलिसांत तक्रार करू शकते.


लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांवरील शिक्षा

1) हाथ पकडणे, चुकीच्या जागी स्पर्श करणे, बळजबरीने मिठी मारणे, चिमटा काढणे, बळजबरीने चुंबन घेणे किंवा अश्लील गोष्टी दाखवणे.

> यासाठी महिला भादंवि कलम 354 A अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते, जर कोणी यात दोषी ठरत असेल, तर दोषीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

 

2) अश्लील टिप्पणी, बळजबरी गप्पा मारणे, अभद्र चाळे करणे, दुहेरी अर्थ असलेले विनोद ऐकवणे
> यासाठी महिला भादंवि कलम 354 A  अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते, अशा प्रकारच्या घटनांमध्ये गुन्हेगाराला एक वर्षाची शिक्षा आणि दंडही भरावा लागू शकतो.

 

3) विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे
> अशा परिस्थितीत आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 B अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि आरोपी दोषी ठरला, तर त्याला 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

 

4) लपून पाहणे किंवा फोटो घेणे
> गुन्हेगाराविरुद्ध भादंवि कलम 354 C अंतर्गत गुन्हा दाखल होईल. पहिल्या वेळेस असे कृत्य केल्यास गुन्हेगाराला 1 ते 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड, तसेच दुसऱ्यांदा असे कृत्य केल्यास त्याला 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही भरावा लागू शकतो.

 

5) पाठलाग करणे किंवा ईच्छेविरुद्ध लक्ष ठेवणे
> अशा स्थितीत भादंवि कलम 354 D अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पहिल्यांदा असे कृत्य केल्यास गुन्हेगाराला 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड आणि दुसऱ्या वेळेस असे कृत्य केल्यास 5 वर्षे शिक्षा आणि दंड भरावा लागू शकतो.


6) इंटरनेट, ई-मेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून लैंगिक अत्याचारांना पाठिंबा देणे
> या परिस्थितीत आरोपीवर लैंगिक अत्याचाराच्या कलमांसोबतच आयटी अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...