आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स अॅक्टसाठी विशाल आदित्‍य सिंह बनला तृतीयपंथी, जिंकले जजेसचे मन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : नच बलिये 9 मध्ये विशाल आदित्‍य सिंह आपल्या माचो स्‍टाइल आणि दमदार फिजीकसाठी खूप प्रसिद्धही. तो डान्सिंगबरोबरच आपल्या वेगळ्या स्‍टाइलने प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. शोमध्ये त्याच्या परफॉरमॅनला प्रेक्षक आणि जज यांचे खूप कौतुक मिळते. हैराणीची गोष्ट ही आहे की, शोमध्ये आपल्या आगामी अॅक्‍टसाठी त्याने एका तृतीयपंथ्यांचे रूप धारण केले होते.  

सोलो अॅक्टने जिंकले प्रेक्षकांचे मन...  
एका तृतीयपंथ्यांचा लुक घेणे आणि एक वेगळा डान्स सादर करणे विशाल सारख्या अॅक्‍टरसाठी एक बोल्‍ड स्‍टेप आहे. हे कोणतेही सोपे काम नव्हते. पण विशालने हे आव्हान स्‍वीकारले आणि एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला. विशालने परफॉर्म केलेल्या सोलो अॅक्‍टने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले आणि प्रेक्षककन वेड लावले.  

भावुक झाला होता विशाल... 
अॅक्‍टनंतर विशाल खूप भावुक झाला आणि तो म्हणाला, ''मी हा अॅक्‍ट माझ्या आईला समर्पित करू इच्छितो, मी भारताच्या उत्‍तरी प्रांतातील आहे. जिथे काही अशी मुले आहेत जी मुलींचे रूप धारण करतात आणि डान्स परफॉर्मन्स देतात. त्यांना असे त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी करावे लागते. त्यांना असे करायचे नसते. ही खूप हिंमतीची गोष्ट आहे आणि मला अपेक्षा आहे की, त्यांना याच्या पर्यायामध्ये एखादेकाम मिळेल. ज्यामुळे ते उत्तम पद्धतीने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतील."

मधुरिमा आहे विशालची पार्टनर... 
शोमध्ये त्याचे सर्वात मोठे वैशिठ्य त्याची मस्‍क्‍युलर बॉडी आहे, ज्याचा त्याने वेगवेगळ्या डान्स स्‍टाइल्‍ससोबत खूप चांगला उपयोग केला आहे. तो या शोमध्ये आपली बलिये मधुरिमासोबत परफॉर्म करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...